आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाबांचा समर्थ वारसा:समाजसेवक डॉ. विकास आमटे यांचा आनंदवनात होणार अमृत महोत्सवी गौरव सोहळा

बीडएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

ज्येष्ठ समजासेवक आणि महारोगी सेवा समितीचे सचिव डॉ. विकास आमटे यांचा अमृत महोत्सवी गौरव सोहळा येत्या 8 नोव्हेंबर रोजी आनंदवन येणे होणार आहे.

डॉ. आमटे यांच्या वयाची पंचाहत्तरी पूर्ण होत आहे. त्यानिमित्त आनंदवन मित्र मंडळ महाराष्ट्र व डॉ. विकास आमटे अमृत महोत्सव सत्कार समितीच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.

हे मान्यवर उपस्थित

सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती मा. विकास शिरपूरकर यांच्या हस्ते व डॉ. प्रकाश आमटे, डॉ. मंदाताई आमटे, डॉ. तात्याराव लहाने यांच्या उपस्थित हा समारंभ संपन्न होणार आहे. डॉ. विकास आमटे यांच्या कार्याची व्यापकता लक्षात घेवून त्यांच्यावर गौरव ग्रंथ ही प्रकाशित करण्यात येणार आहे. सोबत संपूर्ण महाराष्ट्रातून शेकडो कार्यकर्ते उपस्थित राहून गौरव निधी अर्पण करणार आहेत, अशी माहिती संयोजक नरेंद्र मेस्री, दगडू लोमटे, शकील पटेल,अजय स्वामी, गिरीश कुलकर्णी, गोविंद कासट, अनिकेत लोहिया, दीपक नागरगोजे, भूषण साटम, दिलीप पेशवे, अशोक बेलखोडे व आयोजन समितीच्या इतर सदस्यांनी दिली.

सोहळा दिवसभर

सोहळा दिवसभर चालले. सकाळी ९ वाजता ७५ देशी प्रजातींचे वृक्षारोपण करण्यात येईल. १० वाजता सत्काराचा मुख्य कार्यक्रम होईल. दुपारी ३ वाजता आनंदवन मित्र मेळावा आयोजित केला आहे. त्यात उपस्थित आनंदवन मित्र आपले मनोगते मांडतील. ५ वाजता आनंदवन निर्मित स्वरानंदवन हा वाद्यवृंद आपली कला सादर करतील, तर रात्री गझल गायक भीमराव पांचाळे हे मराठी, हिंदी व उर्दू गझल गायन सादर करतील. सोहळ्यासाठी महाराष्ट्रातून व देशातून आनंदवन मित्र उपस्थित राहणार आहेत. तरी ज्यांना उपस्थित त्यांनी आनंदवनला जरूर यावे. येणाऱ्यानी ९८२३००९५१२ या मोबाइल वर संपर्क करावा असेही आवाहन करण्यात आले आहे.

स्वावलंबनाचे तत्व जपले

बाबा आमटे यांच्यानंतर विकाम आमटे यांनी आनंदवनातील कुष्ठरुग्णांचे डॉक्टर या नात्याने उपचार करत त्यांना स्वत:च्या पायावर उभे केले. त्यांना व्यवसाय कौशल्य मिळवून देत बाबांच्या स्वावलंबनाचे तत्वही अमलात आणले. संस्थेला अन्नधान्ये, भाजीपाला याबरोबर घरबांधणीच्या जोडीने आजच्या गरजा पाणी व वीज भागवण्याची कामगिरी आपल्या बांधवांकडून करून घेतली. छपाई काम, शिवणकाम, फर्निचर निर्मिती, विविध प्रकारच्या कापडाचे उत्पादन, चप्पल व बॅगांची निर्मिती इत्यादी दैनंदिन जीवनातील सगळ्या गरजा भागवणारा कार्यशाळेचा पसारा उभारला.

कलेला दिला वाव

इतकेच नव्हे तर आपल्या गरजा पुरवत बाहेरील पुरवठ्याच्या ऑर्डर घेण्याची क्षमताही विकसित केली आहे. ग्रिटींग कार्ड, पोस्टर, लाकडी वस्तू अशा कलाकुसरीच्या गोष्टी तयार करून आनंदवन निवासींच्या कलेला वाव मिळवून दिला. याचाच पुढचा टप्पा म्हणता येईल असा स्वरानंदवन या नावाने प्रसिद्ध झालेला वाद्यवृंद विकसित करून तो स्थिरावला आहे.

शेतकऱ्यांना पाण्याची सोय

घरबांधणीमध्ये पर्यावरणस्नेही, कमी खर्चाची पण सर्व सोयींनीयुक्त अशी अर्धवर्तुळाकार छतांच्या घरांची उभारणी याचबरोबरीने आनंदवनाबरोबर संस्थेच्या इतर प्रकल्प उभारणीत योगदान दिले. झरी-जामणी येथे जाऊन तिथल्या आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना पाण्याची शाश्वत व्यवस्था उभी करून देऊन शेतीच्या दोन हंगामांची सोय करून दिली. त्या गावांवर उभारलेल्या पाणी व्यवस्थेची जबाबदारी सोपवली. बाबांनी काढलेल्या दक्षिण- उत्तर आणि पूर्व -पश्चिम भारत जोडो यात्रांना योग्य पाठिंबा दिला. तशीच बाबांच्या पंजाब शांती यात्रांची काळजी घेतली. बाबा नर्मदा आंदोलनात सहभागी होण्यासाठी बडवानीला गेल्यावर संस्थेची सगळीच जबाबदारी समर्थपणे सांभाळली आहे.

बातम्या आणखी आहेत...