आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशहराच्या विकासासाठी सातत्याने पाठपुरावा करून माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर आणि नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर यांनी कोट्यावधी रुपयांचा निधी खेचून आणत शहरातील प्रमुख रस्त्यांची कामे करण्याचा संकल्प केला सोळा रस्त्यांची कामे झाल्यानंतर आता आणखी नवीन पंधरा रस्त्यांच्या कामासाठी ६९.८५ कोटी रुपये किंमतीच्या रस्ते विकास प्रकल्पासाठी निधी मंजूर करण्यात आला आहे, याबाबत युवानेते डॉ.योगेश क्षीरसागर यांनीही काही महिन्यांपूर्वीच पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली होती ती प्रत्यक्षात दिसू लागली आहे.
बीड नगर परिषदे अंतर्गत महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभाग बीड यांच्यामार्फत अमृत पाणीपुरवठा योजना व भुयारी गटार योजनेची कामे पूर्ण होत आहेत हे करत असताना सध्या असलेल्या रस्त्यांची वाताहात झाली आहे बीड शहरातील प्रमुख १६ रस्त्यांची कामे पूर्ण झाली असून नगरोत्थान महा अभियान योजनेअंतर्गत ३१ डिसेंबर २०१८ रोजी पहिला टप्पा ८६ कोटी रुपयाचा मंजूर झाला होता त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात पंधरा रस्त्यांची कामे करण्यासाठी नगरोत्थान महाअभियान टप्पा क्रमांक २ अंतर्गत प्रधान सचिव नगर विकास खाते यांच्याकडे ७ ऑगस्ट २०१८ रोजी नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर यांनी प्रस्तावातील त्रुटींची पूर्तता करून संबंधित विभागात दाखल केला होता. बीड नगर परिषद अंतर्गत महाराष्ट्र सुवर्णजयंती महा अभियान टप्पा क्रमांक दोन अंतर्गत पंधरा डीपी रस्त्यांच्या कामासाठी ६९ पॉईंट ८५ कोटी रुपये निधी करता नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रशासकीय मंजुरी दिली असून आता बीड शहरातील १५ रस्त्यांची कामे होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे यामध्ये अंबिका चौक ते अर्जुन नगर, राजीव गांधी चौक ते व्यंकटेश स्कूल, राधा किसन नगर ते सरस्वती शाळा खोल वाट, बार्शी रोड ते दीप हॉस्पिटल ते रिपोर्टर भवन, जालना रोड ते थिगळे नाना कॉम्प्लेक्स, कासट यांचे घरापासून ते शहर पोलीस स्टेशन ते अश्विनी दवाखाना, मसरत नगर ते नेत्र धाम ते सावरकर चौक, शितल वस्त्र भांडार मोंढा रोड परिसरातील दोन्ही बाजूचे रस्ते, जालना रोड ते अमरधाम स्मशानभूमी बिंदुसरा पूल, पेठ बीड पोलीस स्टेशन इदगाह ते नालवंडी रस्ता, नाळवंडी नाका ते पाण्याची टाकी, बालाजी मंदिर ते काळा हनुमान ठाणा, बार्शी रोड मुक्ता लॉन्स ते तकीया मज्जीद ते फ्रुट मार्केट ते खासबाग देवी रोड, अंकुश नगर ते पाण्याची टाकी अशी १५ रस्ते सीसी व ड्रेन बांधकाम करण्यात येणार आहेत, नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर यांनी माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या माध्यमातून २०१८ पासून सातत्याने या रस्त्याच्या कामांसाठी पाठपुरावा केला आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.