आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बांधकाम:दिंद्रुडच्या रस्त्यावर वाळू, मुरुमाचे ढिगारे; रहदारीस अडथळा

दिंद्रुड3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

माजलगाव तालुक्यातील दिंद्रुड येथील मुख्य रस्त्यावर वाळू, मुरुमाचे ढिगारे तीन-तीन महिने पडून असल्याने बाजारपेठेत रहदारीस अडथळा निर्माण झाला आहे. बांधकाम करणाऱ्या बांधकामदारांनी दारात दाबून बांधकाम मटेरियल टाकण्या ऐवजी भररस्त्यात मुरूम व वाळूचे ढीग रचल्याने वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण झाला असून अपघाताचे प्रमाण वाढले आहे.

येथील बीड- परळी महामार्गापासून दिंद्रुड या मुख्य रस्त्यावर जवळपास दहा ते बारा ठिकाणी बांधकाम धारकांनी वाळू, मुरूम व विटांचा ढिगारा रस्त्यात रचला आहे. यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होऊन अनेक छोटे-मोठे अपघात होत आहेत. ये - जा करणाऱ्या वाहतूकदारांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे, त्यातच प्रत्येक रविवारी आठवडी बाजार असल्याने या मुख्य रस्त्यावर जागोजागी ट्राफीक होते यामुळे वाटसरुंना आणि नागरिक त्रस्त होत आहेत. बांधकाम करणारे काही जागामालक रस्त्यावर टाकलेले बांधकाम मटेरियल लवकर उचलून घेतात. मात्र काही लोकांनी मुरूम, वाळू व विटाचे ढिगारे तीन-तीन महिने भररस्त्यात टाकल्यामुळे त्या ढिगाऱ्यावर अक्षरशा: मोठमोठे गवत उगवले आहे.

पोलिस स्टेशन, बॅंक व दिंद्रुडची मोठी बाजारपेठ या रस्त्यावर असल्याने सतत ची वर्दळ असते, एक मिनिटाची ये - जा करणाऱ्या या रस्त्यावर पंधरा ते वीस मिनिट लागत असून, याची दखल दिंद्रुड ग्रामपंचायत चे सरपंच अजय कोमटवार व ग्रामविस्तार अधिकारी बाबासाहेब शिंदे यांनी घेतली असून जागा मालकांना नोटीस देत रस्त्यात पडलेले बांधकाम साहित्य उचला अन्यथा यापुढे होणाऱ्या अपघातास आपण सर्वस्वी जबाबदार राहाल व आपणावर कारवाई करण्यात येईल, असा इशारा नोटीसद्वारे दिला आहे.नोटीस बजावल्यानंतर, गावातील एकाच जागा मालकाने रस्त्यावरील अतिक्रमण हटवत आपले बांधकाम साहित्य उचलून घेतले. इतरांनी कसलीही दखल घेतली नाही. त्यामुळे आता काय कारवाई करणार याकडे व्यापारी, गावकऱ्यांचे लक्ष आहे.

बातम्या आणखी आहेत...