आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराप्रत्येक गोष्टीत रा.स्व.संघ आहे ही गोष्टच चुकीची असून संघ कोणत्याही निवडणुकीत भाग घेत नाही संघांची काही तत्त्वे आहेत त्यानुसार त्याचे कार्य आहे असे मत शरदराव हेबाळकर यांनी येथे व्यक्त केले.
भारतीय शिक्षण प्रसारक संस्था अंबाजोगाई पंचवार्षिक निवडणुक शिक्षक, सभासद सन्मान पॅनलच्या प्रचार शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते. यावेळी संस्थेचे संस्थापक शिक्षक तुळशीराम धायगुडे, डॉ. प्रकाश आनंदगावकर, पंजाबराव मस्के, दिलीप सोनवळकर आदी उपस्थित होते. पुढे हेबाळकर म्हणाले की, भाशिप्र म्हणजे शिक्षकांनी चालविलेली संस्था असून जे कार्यकर्ते या परिस्थितीला तोंड देऊन परिवर्तन करू शकतात ते या शिक्षक,सभासद सन्मान पॅनलमध्ये आहेत आता प्रत्यक्ष भेटीगाठी आणि संपर्क मोहीम यशस्वीपणे राबविण्याची सूचना त्यांनी केली.
भारतीय शिक्षण प्रसारक संस्था कार्यकारी मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत शिक्षक, सभासद सन्मान पॅनलच्या प्रचाराचा शुभारंभ करताना संस्थापक सभासद तुळशीराम धायगुडे, पूर्व कार्यवाह शरद हेबाळकर, डॉ. प्रकाश आनंदगावकर,पंजाबराव मस्के आदी उपस्थित होते डॉ.आनंदगांवकर यांनी सांगितले की भाशिप्र संस्था मुळ शिक्षकांची संस्था असून सध्या त्या विचारांना मुठमाती देण्याचे काम होत आहे म्हणून या निवडणुकीत जागृत पणे मतदान करून योग्य व्यक्ति असणाऱ्या शिक्षक सभासद सन्मान पॅनलला विजयी करण्याचे आवाहन त्यांनी केले.
तुळशीराम धायगुडे यांनी शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे प्रास्तविक दिलीप सोनवळकर यांनी केले, संचलन ग्यानबा महाळंगे यांनी केले पॅनल च्या वतीने निवडणुक लढवणाऱ्या सर्व उमेदवारांनी जेष्ठांचे आशीर्वाद घेतले. उमेदवार प्रचार पत्राचे विमोचनही मान्यवरांच्या हस्ते करण्यात यावेळी शिक्षक सभासद सन्मान पॅनलचे प्रा. सतिश पत्की,सौ.शरयु हेबाळकर, सौ. अनुपमा जाधव,अविनाश तळणीकर,किरण डुघरेकर मनोज रापतवार आदीसह इतर उमेदवार सभासद मोठया संख्येने उपस्थित होते
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.