आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकेज शहरातील उमरी रस्त्याच्या मजबुतीकरण व सिमेंट काँक्रीट कामासाठी ९८ लाख रुपयांचा निधी मंजूर झालेला असताना काम सुरू करण्यास चालढकलपणा करणाऱ्या नगरपंचायतीच्या विरोधात केज विकास संघर्ष समितीने सोमवारी (दि. ५) घंटानाद आंदोलन केले. उमरी रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर लोकवस्ती झाली असून या रस्त्याचे काम वर्षानुवर्षे प्रलंबित राहत असल्याने नागरिकांचा रहदारीचा प्रश्न सुटलेला नाही. पावसाळ्याच्या दिवसात नागरिकांचे हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. रस्त्याच्या कामासाठी निविदा (टेंडर) प्रक्रिया पार पाडण्यासाठी व प्रत्यक्ष काम सुरु करण्यासाठी नगराध्यक्षा सीता बनसोड व जनविकास परिवर्तन आघाडीचे प्रमुख हारून इनामदार यांनी वेळ मागून घेतला होता. तर काम सुरू करण्यास नगरपंचायतीने वेळ काढू धोरण अवलंबिल्यामुळे शेवटी केज विकास संघर्ष समितीने सोमवारी कार्यालयासमोर घंटा व थाळीनाद आंदोलन केले. आंदोलनात संघर्ष समितीचे समन्वयक हनुमंत भोसले यांच्यासह अजीम इनामदार, अतुल गवळी, तात्या रोडे, प्रतीक भोसले, रितेश साखरे, गणेश निंगुळे हे सहभागी झाले होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.