आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अध्यात्म:‘संत बंकटस्वामी महाराज संप्रदायाचे उष:काल होते’ ; महंत लक्ष्मण महाराज मेंगडे यांचे प्रतिपादन

बीड2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

संत बंकटस्वामी महाराज यांनी कीर्तन, भजनाच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्र ढवळून काढला. त्यामुळेच महाराष्ट्रात आज वारकरी संप्रदायाचे उभे पीक आले आहे. स्वामी महाराज म्हणजे वारकरी संप्रदायाचा उषःकाल आहेत. असे प्रतिपादन महंत लक्ष्मण महाराज मेंगडे यांनी केले.

नेकनूर येथे आयोजित भव्य पुण्यतिथी उत्सवात चौथे कीर्तन पुष्प गुंफताना बोलत होते. यावेळी राम महाराज काजळे, श्याम महाराज पवार, सुरेश महाराज जाधव, विष्णुपंत महाराज लोंढे, अच्युत महाराज घोडके, रंजीत महाराज शिंदे, दिनेश महाराज काळे, गोविंद महाराज नाईकवाडे, बाजीराव महाराज काळे यांच्यासह हजारो भाविक भक्तांची उपस्थिती होती.

लक्ष्मण महाराज मेंगडे यांनी भूपाळी याप्रकरणातील संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या ‘योगिया दुर्लभ तो म्या देखिला साजणी’ या अभंगावर चिंतन मांडले. महाराज म्हणाले, संत ज्ञानेश्वर महाराज हे आपल्या बुद्धी रूपी मैत्रिणीशी बोलताना सांगतात की, साजणी मी योग्यांना दुर्लभ असलेला देव पाहिलाआणि तो देव सतत पहात राहावा असं मनाला वाटतं . जो देव पाहिला तो देवाचा ही देव आहे. त्याच्यामुळे माझ्या मनातील सर्व संदेह मिटून गेले. बंकटस्वामी महाराज आणि संत गाडगे महाराज यांनी मुंबईत वारकरी संप्रदाय जिवंत ठेवण्याचं काम केले. सद्गुरु जोग महाराज यांच्या मार्गदर्शनाने वारकरी शिक्षण संस्थेची स्थापना करून अध्यात्मिक धडे दिले.त्यामधून आज महाराष्ट्रात शेकडो ठिकाणी हरिनाम सप्ताह मोठा थाटामाटात होत आहेत.

आचारसंहिता स्वामींची

वारकरी संप्रदायाला आचारसंहिता देण्याचे काम बंकटस्वामींनी केले. सध्या प्रचलीत असलेल्या कीर्तन भजनातील सर्वच भजनी चाली, वारकरी संप्रदायाची अलिखित आचार संहिता देण्याचे काम बंकटस्वामी महाराज यांनी केले. त्यामुळे वारकरी संप्रदायात बंकटस्वामींचे मोठे योगदान आहे असे मेंगडे महाराज म्हणाले. या सप्ताहात कीर्तनास साथ-संगत बंकट स्वामी वारकरी शिक्षण संस्थेतील सर्व विद्यार्थी तसेच रामहरी बाबा संस्कार आश्रम वानगाव फाटा येथील विद्यार्थ्यच्यासह बंकट स्वामी महाराज फडावरील सर्व टाळकरी मंडळींची उपस्थिती होती.

बातम्या आणखी आहेत...