आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रतिपादन:संत नगद नारायण महाराजांनी जीवन‎ भागवत धर्म प्रचारासाठी समर्पित केले

गेवराई‎एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

संत नगद नारायण महाराज हे थोर तपस्वी‎ साधू होवून गेले. त्यांनी समाजाच्या‎ कल्याणासाठी कार्य केले. आपले जीवन‎ भागवत धर्माच्या प्रचारासाठी समर्पित केले‎ असे प्रतिपादन शिवा महाराज बावस्कर‎ यांनी केले.‎ शहरातील गजानन नगर भागातील संत‎ गजानन महाराज मंदिरात संत नगद‎ नारायण महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त‎ नारायण गडाचे महंत शिवाजी महाराज‎ यांच्या हस्ते व क्रुर महाराज साखरे यांच्या‎ मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या कीर्तन‎ महोत्सवात सहावे पुष्प गुंफताना शिवा‎ महाराज बोलत होते.‎

यावेळी चिंतेश्वर संस्थानचे महंत दिलीप‎ महाराज घोगे, रामेश्वर महाराज राऊत‎ आदी उपस्थित होते. शिवा महाराज‎ म्हणाले की, संसारात जास्त चिटकून राहू‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ नका संसार वाईट नाही. परंतू परमार्थात‎ वेळ द्या. महात्मे आपल्याकडून दान करुन‎ घेतात.‎ सज्जन हे परमार्थात दानधर्म करतात तर‎ दुर्जन हे आपले पैसे दवाखाना व कोर्ट‎ कचेरीत खर्च करतात. म्हणुन सज्जन‎ म्हणून परमार्थात दानधर्म करुन‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ भक्तिभावाने संसार करा आनंदात रहा.‎ त्याच बरोबर आई वडिलांची सेवा करुन‎ आई- वडिलांना विठ्ठल-रखुमाईच्या रुपात‎ पहा असेही त्यांनी सांगितले. या कीर्तन‎ सोहळ्यातील पदाधिकाऱ्यांसह टाळकरी,‎ वारकरी, महिला व पुरुष भाविकांची‎ मोठ्या संख्येने उपस्थिती होती.‎

बातम्या आणखी आहेत...