आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शासन:संत नारायणबाबा देवस्थानाला“ब’ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा मंजूर

बीड16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

माजलगाव तालुक्यातील वांगी येथील श्री संत नारायणबाबा देवस्थानास तीर्थक्षेत्राचा “ब’ वर्ग दर्जा मिळण्यासाठी शासनास प्रस्ताव सादर करण्यात आला होता. या प्रस्तावास मंजुरी मिळाल्याची माहिती आमदार प्रकाश सोळंके यांनी दिली. या कामासाठी गेल्या वर्षभरात तत्कालीन ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ व सध्याचे ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांच्याकडे पाठपुरावा केला. त्यानंतर ग्रामविकास विभागाने १० नोव्हेंबर २०२२ रोजीच्या आदेशान्वये मंजुरी दिली. लवकरच या तीर्थक्षेत्राच्या विविध विकासकामांसाठी भविष्यात दोन कोटी रुपयांचा निधी उपलब्ध होणार असल्याची माहिती सोळंके यांनी दिली. दरम्यान, तीर्थक्षेत्रास मंजुरी मिळाल्यानंतर आता गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या विकासकामांना गती येणार आहे. आमदार सोळंके यांचे वांगी येथील भाविकांनी याबद्दल आभार मानले आहेत. ब वर्ग दर्जा मिळाल्याने या स्थानाचा विकास होणार आहे.

बातम्या आणखी आहेत...