आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राष्ट्रीय बैठक:कॅटच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष व मराठवाडा अध्यक्षपदी संतोष सोहनी

बीड19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

दिल्लीत गुरुवारी झालेल्या कॅटच्या राष्ट्रीय बैठकीत सर्वानुमते महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष आणि मराठवाडा अध्यक्षपदी बीड जिल्हा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष संतोष सोहनी यांची निवड करण्यात आली.या बैठकीत कॉन्फ्रेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सचे राष्ट्रीय महामंत्री प्रवीण खंडेलवाल व उपाध्यक्ष धैर्यशील पाटील, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सचिन निवांगुने, शंकरभाई ठक्कर, महेशभाई बकाई, सुरेश टक्कर व अन्य पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सोहनी यांची सर्वानुमते ही निवड केली. या निवडीबद्दल सोहनींचे बीड शहर व्यापारी महासंघाचे शहराध्यक्ष विनोद पिंगळे, दत्तप्रसाद तापडिया, रवींद्र बजगुडे, जितेश पडधरिया, जवाहरलाल कांकरीया, सुरेश बरगे, संजय सोळंके, मयुर बडेरा, सुनील कलंत्री, डॉ. चेतन मुनोत, वर्धमान खिवंसरा, नंदकुमार बियाणी, महेश आदे, सूर्यकांत महाजन, भास्कर गायकवाड, प्रमोद निनाळ, राहुल खुरपे, प्रताप खरात, मिलन ललवाणी आदींनी अभिनंदन केले.

पहिल्यांदाच मिळाला बीड जिल्ह्याला मान
जिल्हा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष संतोष सोहनींची कॅटच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष आणि मराठवाडा अध्यक्षपदी निवड झाल्याने मराठवाड्याला पहिल्यांदा अध्यक्षपदाचा मान मिळाला आहे. जिल्ह्यातील व्यापाऱ्यांच्या दृष्टीने ही आनंदाची बाब असल्याची प्रतिक्रिया बीड शहर व्यापारी महासंघाचे शहराध्यक्ष विनोद पिंगळे यांनी व्यक्त केली.

बातम्या आणखी आहेत...