आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साहित्य:सर्जा-राजाच्या सजावटीला वाढत्या महागाईचा ‘साज’ ; पोळा सणानिमित्त शेतकऱ्यांमध्ये लगबग

बीड3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा असलेला बैलपोळा सण शुक्रवारी आहे. आपल्या लाडक्या सर्जा-राजाला सजवण्यासाठी शेतकरी या दिवशी मेहनत घेतो. मात्र, पोळ्याच्या सजावटीला यंदा महागाईचा साज असून सजावटीच्या साहित्याचे दर २० ते २५ टक्क्यांनी वाढलेेत. तरीही बाजारपेठेत या सणामुळे चैतन्य आहे.

सर्जा-राजाला सजवण्यासाठीचे साहित्य खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी वाढली आहे. शेतकरी वर्षभर बैलांकडून शेतीत मोठ्या प्रमाणावर कष्ट करून घेतो, त्याच्या प्रति कृतज्ञता म्हणून हा सण साजरा केला जातो. या दिवशी गोडधोड नैवेद्य बैलांना खाण्यासाठी देतात. संध्याकाळी सजवून त्यांची मिरवणूकही काढली जाते. पोळ्याच्या दिवशी ज्यांच्याकडे बैल नाहीत ते मातीच्या बैलांची पूजा करतात. शहरी भागात हे प्रमाण जास्त आहे. त्यासाठी विविध आकारांतील आकर्षक मूर्ती बाजारपेठेत दाखल झाल्या आहेत. गतवर्षीच्या तुलनेत या मूर्तींच्या किमतीतही १० टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे.

मातीची बैलजोडी १२० ते २५० रुपयांना : शहरात पोळा सणानिमित्त सुरेख अशा बैलजोड्या आल्या असून मागणी वाढत आहे. यात १२० ते २५० रुपयांपर्यंत बैलजोडी आहे. विविध उंचीच्या बैलजोड्या असून काही पीओपीपासून बनवलेल्याही बैलांच्या मूर्ती आहेत. आकारानुसार दरांमध्ये फरक आहे, असे विक्रेत्यांनी सांगितले.

दीड ते पाच हजार रुपये खर्च
एक बैलजोडी सजावटीसाठी दीड ते पाच हजार रुपयांपर्यंत खर्च लागतो. यंदा हा खर्च २५ टक्क्यांनी वाढला आहे. दरवर्षी जनावरे कमी होत चालली आहेत. मात्र, शेतकऱ्यांमधील उत्साह कायम आहे. कोरोनाच्या दोन वर्षांनंतर यंदा मोठ्या उत्साहात पोळा होत आहे. त्यामुळे यंदा बाजारपेठा गजबजल्या आहेत.
राम शिंदे, विक्रेता

पोलिसांकडून कडक बंदोबस्त
दरम्यान, अनेक गावांमध्ये सामुदायिक पाेळा साजरा केला जातो. बैलांच्या एकत्रित मिरवणुका काढल्या जातात. यामुळे कुठलाही वाद होऊ नये यासाठी पोलिस ठाणे स्तरावरून बंदोबस्त तैनात करण्यात येणार असल्याची माहिती पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी दिली.

बातम्या आणखी आहेत...