आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रवेश:सरपंच नैराळे, चेअरमन‎ येळवेंचा भाजपत प्रवेश‎

बीड‎एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

लिंबागणेश जिल्हापरिषद गटातील‎ नागझरी-मान्याचावाडा येथील‎ विद्यमान सरपंच महादेव नैराळे यांनी‎ सदस्य व समर्थकासह बीड येथे बीड‎ खासदार डॉ. प्रितम मुंडे व भाजपा‎ जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांच्या‎ उपस्थितीत भारतीय जनता पार्टीत‎ प्रवेश केला.‎ लिंबागणेश जिल्हा परिषद‎ गटातील जनतेने जयश्री राजेंद्र मस्के‎ यांना भरघोस मताने निवडून दिले.‎ या विजयामुळे जिल्हा परिषदेचे‎ उपाध्यक्ष पद भूषवण्याचा बहुमान‎ मिळाला. तत्कालीन पालकमंत्री‎ लोकनेत्या पंकजा मुंडे यांच्या‎ साहाय्याने लिंबागणेश गटामध्ये‎ विविध विकास कामे मस्के यांनी‎ केले.

विश्वासू आणि कर्तबगार‎ नेतृत्व म्हणून राजेंद्र मस्के यांच्यावर‎ विश्वास व्यक्त करत नागझरी येथील‎ विद्यमान सरपंच महादेव नैराळे व‎ सेवा सोसायटीचे चेअरमन बाळू‎ अंकुश येळवे, उपसरपंच येळवे,‎ सतीश कळसुले, अजित लक्ष्मण‎ माने, ज्योतिराम नैराळे, ईश्वर‎ पाहुणे,शिवाजी मंचरे, बाबासाहेब‎ नैराळे, बाळू माने, लहू‎ येळवे,नानासाहे शिंदे, भारत‎ माने,बाळू माने,आबा‎ येळवे,समाधान वाघमारे, कृष्णा‎ मंचरे,बाजीराव मंचरे, रामा मंचरे,‎ शरद कळसुले, दादा कळसुले,‎ प्रकाश नैराळे, फुलचंद नैराळे,‎ पांडुरंग येळवे, महेश पाहुणे, गोपाल‎ येळवे, शंकर नैराळे, कुलभूषण‎ नैराळे, जयराम नैराळे, रावसाहेब‎ नैराळे, नामदेव नैराळे, बिभीषण‎ शिंदे, सचिन कळसुळे, विष्णू‎ आव्हाड, रावण नैराळे, पांडुरंग‎ नैराळे, उमेश माने, शेषेराव नैराळे,‎ रुस्तुम माने, तुकाराम नैराळे, सुंदर‎ येळवे, भारत येळवे, बाबा नैराळे,‎ तुकाराम शिंदे, नवनाथ नैराळे,‎ नागनाथ चव्हाण, शरद वाघमारे,‎ गोकुळ शिंदे, विशाल कदम, बाबुराव‎ नैराळे, संग्राम नैराळे, विलास नैराळे,‎ सखाराम मंचरे, शरद कळसुले,‎ बप्पा येळवे यांनी आपल्या‎ सहकाऱ्यांसह भाजपात प्रवेश केला.‎ सर्वांचे डॉ.मुंडे यांनी स्वागत केले.

बातम्या आणखी आहेत...