आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दायित्व:तांबा राजुरीचे सरपंच तांबे करतात दर उन्हाळ्यात मोफत पाणीपुरवठा ; 4 वस्त्यांमधील नागरिकांची तहान

पाटोदा19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रत्येक वर्षी उन्हाळ्याच्या दिवसात गावार्तंगत असणाऱ्या चार वस्त्यांवरील नागरिकांचे पाण्याच्या दुर्भीक्षामुळे होणारे हाल लक्षात घेतल्यानंतर तांबाराजुरीचे सरपंच दीपक तांबे यांनी पुढाकार घेत शासकीय योजनेची वाट न पाहता नागरिकांसाठी स्वखर्चातूनच प्रत्येक वस्तीवर पाण्याचे टँकर पाठवण्याचा उपक्रम सुरू केला. गेल्या सहा वर्षांपासून तांबे यांचा हा उपक्रम अखंडपणे सुरू आहे.

पाटोद्यातील ३ हजारांच्या आसपास लोकसंख्या असलेले तांबाराजुरी गाव. सन २०१७ साली या गावचे सरपंच म्हणून दीपक तांबे यांची निवड झाली. त्यानंतर तांबे यांनी आपल्या गावामध्ये गावच्या विकासासाठी अनेक लोकोपयोगी योजना राबवल्या. याच तांबाराजुरी ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या चार चार वस्त्यांमध्ये यामध्ये खंडोबा वस्ती, नेमाने वस्ती, वरचा मळा, भोनाई वस्ती या वस्त्यांवर साधारणतः प्रत्येक वस्तीवर ४० ते ५० कुटुंब राहतात. या ठिकाणी ग्रामपंचायत अंतर्गत महाजल योजनेमधून आमदार सुरेश धस यांच्या प्रयत्नातून पाणी परवठ्याची कामे झाली होती.

मात्र या ठिकाणी प्रत्येक उन्हाळ्यात जलस्त्रोत म्हटल्यानंतर मोठ्या प्रमाणात पाण्याचे दुर्भिक्ष जाणवते. यावेळी या भागातील नागरिकांची पाण्यासाठी मोठ्या प्रमाणात वणवण होते. नागरिकांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन सरपंच दीपक तांबे यांनी ते सरपंच होण्यापूर्वीच म्हणजे २०१६ पासून या वस्त्यांवर प्रत्येक उन्हाळ्यात स्वखर्चातून सहा हजार लिटर पाणी टँकरद्वारे पोहोच करण्याचा उपक्रम सुरू केला.

गेल्या सहा वर्षांपासून त्यांचा हा उपक्रम अखंडपणे सुरूच आहे. यंदाही मागील तीन महिन्यांपासून संपूर्ण उन्हाळाभर तांबे हे स्वखर्चातून टँकरद्वारे पाणीपुरवठा करून या परिसरातील वस्त्यांवरील नागरिकांची तहान भागवण्याचे काम करीत आहेत. त्यांच्या या उपक्रमामुळे या वस्त्यांवरील नागरिकांची पाण्यासाठी होणारी भटकंती व गैरसोय थांबली आहे. सरपंच तांबे यांनी तांबाराजुरी ग्रामपंचायतींतर्गत वस्त्यांवरील नागरिकांची कायमस्वरूपी पाण्याची सोय व्हावी, यासाठी आमदार धसांकडे पाठपुरावा करून जलजीवन योजनेस मंजुरी आणली आहे.

बातम्या आणखी आहेत...