आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातालुक्यातील नांदूर हवेली ग्रामपंचायतीने जलजीवन मिशनमध्ये नळाद्वारे गावात स्वच्छ पाणीपुरवठा करत देखभाल व व्यवस्थापनाचे उल्लेखनीय कार्य केल्याद्दल या गावच्या महिला सरपंच शेख मन्नाबी मुजफ्फर पटेल यांना स्वच्छ सुजल शक्ती सन्मान २०२३ या पुरस्काराने केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
दिल्ली येथील विज्ञान भवनात केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाच्या वतीने शनिवारी (४ मार्च) स्वच्छ सुजल शक्ती सन्मान २०२३ या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी जलशक्ती अभियान ‘कॅच द रेन २०२३’ या कार्यक्रमाचा शुभारंभ देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते करण्यात आला. केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाच्या वतीने देशभरातील सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायतींमध्ये असणाऱ्या महिलांचा स्वच्छ सुजल शक्ती सन्मान २०२३ या पुरस्काराने गौरव करण्यात आला.
यात १८ माहिलांचा सन्मान राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हस्ते प्रशस्तिपत्र देऊन करण्यात आला. १८ महिलांचा सन्मान केंद्रीय जलशक्तिमंत्री शेखावत यांच्या हस्ते करण्यात आला. बीड जिल्ह्यातील नांदूर हवेलीच्या सरपंच शेख मन्नाबी पटेल यांनाही सन्मानित करण्यात आले. या वेळी केंद्रीय जलशक्तिमंत्री गजेंद्रसिंह शेखावत, केंद्रीय जलशक्ती राज्यमंत्री प्रल्हादसिंह पटेल, विश्वेश्वर टुडू, केंद्रीय संचार राज्यमंत्री देवूसिंह चौहान, जलसंसाधन, नदीविकास सचिव पंकजकुमार व्यासपीठावर उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.