आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सरपंचपदाचा उमेदवारच:सरपंचपद रिक्त; उपसरपंचाकडे दिला पदभार‎

बीड‎एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

सरपंचपदाचा उमेदवारच उपसरपंच म्हणून‎ निवड झालेल्या महिलेकडेच‎ सरपंच पदाचा पदभार आणि गावचा‎ कारभार दिला गेला. बीड‎ तालुक्यातील सोमनाथ वाडीत हा‎ प्रकार घडला.‎ बीड तालुक्यातील सोमनाथ वाडी‎ ग्रामपंचायतीची नुकतीच निवडणूक‎ झाली. थेट जनतेतून सरपंच पदाची‎ निवड असल्याने एकीकडे‎ जिल्हाभरात चुरशीच्या लढती‎ झाल्या.

सोमनाथ वाडीत ओबीसी‎ प्रवर्गासाठी उपसरपंच पद राखीव‎ होते. मात्र, गावात एकही ओबीसी‎ प्रवर्गाचे इच्छुक नसल्याने सरपंच‎ पदाची निवडणुक लढण्यासाठी‎ उमेदवारच मिळाला नाही. त्यामुळे‎ केवळ सदस्यपदासाठी निवडणुक‎ पार पडली. नुकतीच उपसरपंच‎ पदाची निवडणुक झाली यात,‎ ज्यातली शेळके यांची उपसरपंच‎ पदी बिनविरोध निवड झाली. सरपंच‎ पद रिक्त असल्याने सरपंच पदाचा‎ पदभारही शेळके यांच्याकडे‎ सोपवण्यात आला. भाजप‎ कार्यालयात त्यांचा जिल्हाध्यक्ष‎ मस्के यांच्या हस्ते करण्यात आला.‎

बातम्या आणखी आहेत...