आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजीवनात चांगले सत्कर्म केल्यास समाधान, शांतता आणि आनंद मिळतो. सेवानिवृत्तीनंतर विधायक कामे करून सत्कर्म करावे. जीवनात हे राहून गेले, ते करायला पाहिजे होते, असे शेवटी वाटू नये, म्हणून प्रत्येकांने चांगले जीवन जगून घ्यावे, असे प्रतिपादन बीड जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळंके यांनी केले. बीड जिल्हा परिषदेतील लघुलिपिक विजया महादेव सानप यांच्या सेवापूर्ती सोहळयाच्या निमित्ताने ते बोलत होत. या कार्यक्रमास माजी आमदार ॲड. उषाताई दराडे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद काळे, उपायुक्त प्रविण मुंडे, सहकार महर्षि राजाभाऊ मुंडे, गटविकास अधिकारी अनिरुध्द सानप आदींची प्रमुख उपस्थिती होती.तर अध्यक्षस्थानी शिक्षणाधिकारी (प्रा.) श्रीकांत कुलकर्णी यांची उपस्थिती होती.
याप्रसंगी माजी आमदार ॲड.सौ. उषाताई दराडे आपल्या भाषणात बोलतांना म्हणाल्या, विजयताई सानप यांनी जिल्हा परिषद सेवेत अत्यंत प्रामाणिकपणे सेवा केली. माझ्या अध्यक्षपदाच्या काळात उत्कृष्ण काम केल्यामुळे आम्हाला सामुहिकरित्या विविध कामे करता आली. यावेळी डॉ.विनायक खेडकर यांनी लहानपणीच्या कौटुबिक आठवणीला उजाळा देवून आपण आक्का विजया यांमुळे घडलो आणि यशस्वी स्त्रिरोगतज्ञ होत्यात त्यांचा मोठा वाटा असल्याचे त्यांनी सांगितले. याप्रसंगी प्रभारी मुख्य व लेखा वित्त अधिकारी जटाळे यांनी कृतीयुक्त विचार मांडून सौ.विजया सानप यांच्याविषयी गौरवोदगार काढले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.