आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आंदोलन:जिल्हा कचेरीसमोर प्रतीकात्मक रेल्वे चालवून सत्याग्रह आंदोलन

बीड2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - बीड - परळी या प्रलंबित रेल्वेमार्गाच्या कामाचे उद्घाटन करताना सातत्याने आंदोलने उभारून शासन दरबारी पाठपुरावा करणाऱ्या विद्यार्थी युवा रेल्वे कृती समिती, स्वातंत्र्यसैनिक रेल्वे कृती समिती, नागरी युवक संघटना, युक्रांद संघटना आदींना निमंत्रण दिले नाही. अर्धवट कामाचे उद्घाटन शासन आणि लोकप्रतिनिधींकडून दिशाभूल केल्याच्या निषेधार्थ व रेल्वे आंदोलनकर्ते यांच्या सन्मानार्थ उर्वरित काम तातडीने पूर्ण करावे या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर प्रतीकात्मक रेल्वे चालवून सत्याग्रह आंदोलन करण्यात आले.

सामाजिक कार्यकर्ते े डॉ. गणेश ढवळे लिंबागणेश कर यांच्या नेतृत्वाखाली रविवारी हे आंदोलन करण्यात आले. आंदोलनात अशोक हांगे, सी. ए. अशोक जाधव, शेख युनुसकर, कवठेकर, सय्यद आबेद, शेख मुबीन, किस्किंदा पांचाळ, शेख मुस्ताक, अशोक येडे, संतोष ढाकणे आदी सहभागी झाले. निवासी उपजिल्हाधिकारी संतोष राऊत यांच्यामार्फत पंतप्रधान, रेल्वेमंत्री यांना निवेदन देण्यात आले. पदाधिकाऱ्यांची ज्येष्ठ संपादक नामदेवराव क्षीरसागर, माजी आ. सुनील धांडे, सत्यनारायण लाहोटी, मंगेश लोळगे, विद्यार्थी युवा रेल्वे कृती समितीचे अशोक हांगे, संगमेश्वर आंधळकर, रामनाथ खोड आदींनी भेट घेतली

बातम्या आणखी आहेत...