आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शालेय प्रवेशोत्सव:जिल्ह्यात उन्हाळ्याच्या सुटीनंतर शाळा गजबजल्या; स्वागताने भारावून गेले विद्यार्थी; वर्गमित्रांसोबत गप्पांमध्ये रमले विद्यार्थी

बीड21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 3685 शाळांची वाजली घंटा

उन्हाळ्याच्या सुट्यांनंतर बुधवारी (१५ जून) जिल्ह्यात जिल्हा परिषदेसह संस्थेच्या शाळांची पहिली घंटा वाजली. जिल्हाभरात ठिकठिकाणी विद्यार्थ्यांचे पुष्प देऊन, तर कुठे घोड्यावर, ट्रॅक्टर ट्राॅलीत, तर कुठे बैलगाड्यांतून बसवून आणत शाळांमध्ये प्रवेशोत्सव साजरा करत शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे जोरदार स्वागत केले. या वेळी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आला, तर पहिलीत प्रवेश घेणाऱ्या काही नवीन बालकांना आपल्या पालकांना सोडून करमत नसल्याने रडायला आल्याचे चित्र दिसून आले.

उन्हाळ्याच्या सुटीनंतर जिल्ह्यात बुधवारी शाळा गजबजल्या. शाळा प्रवेशोत्सवाच्या निमित्ताने जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळंके, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) श्रीकांत कुलकर्णी, जिल्हा समन्वयक राहुल चाटे यांनी खोकरमोहा येथील जि. प. माध्यमिक शाळेला भेट देत विद्यार्थ्यांना गणवेश, पुस्तके, फुले देऊन स्वागत केले. तसेच खगोलशास्त्राची माहिती विद्यार्थ्यांना दिली. प्रवेशोत्सवासाठी गटविकास अधिकारी महादेव जायभाये, गटशिक्षणाधिकारी जमीर शेख, माजी सभापती सुधाकर मिसाळ आदी उपस्थित होते. पुढील वर्गात प्रवेश घेतल्याचा आनंद द्विगुणित करत वर्गमित्र गप्पांत रमून गेल्याचे दिसून आले.

शिरूर : शिक्षकांच्या मुलाची घोड्यावरून मिरवणूक
येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षक दादा सोनवणे यांच्या मुलाची घोड्यावर बसवून मिरवणूक काढण्यात आली. पहिलीच्या वर्गातील मुलांचे मुख्याध्यापक अंकुश शिंदे यांनी गुलाबाची फुले देऊन स्वागत केले.

केज : विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देत स्वागत; गणवेश, पुस्तकांचे वाटप
तालुक्यात जिल्हा परिषदेच्या २५३ शाळा असून १११ खासगी शाळा बुधवारी सुरू झाल्या. शाळांत किलबिलाट होता. विद्यार्थ्यांना गुलाबपुष्प, गणवेश, पुस्तके वाटप केली. गटशिक्षणाधिकारी सुनील केंद्रेंनी सोनीजवळा, सावता वस्ती, युसूफवडगाव, जानेगाव येथील शाळेला, तर शिक्षण विस्तार अधिकारी दत्ता चाटे यांनी क्रांतीनगर शाळेला भेट दिली.

कुंबेफळ : विद्यार्थ्यांची ट्रॅक्टरमधून मिरवणूक
अंबाजोगाई तालुक्यातील कुंबेफळ जिल्हा परिषदेच्या शाळेच्या पहिलीच्या विद्यार्थ्यांची ट्रॅक्टरमधून वाजतगाजत मिरवणूक काढली. गटशिक्षणाधिकारी रंगनाथ राऊत यांनी मिरवणुकीत सहभाग नोंदवला. शाळेत आलेल्या पहिलीतील विद्यार्थ्यावर सातवीच्या विद्यार्थ्यांनी पुष्पवृष्टी करत त्यांचे स्वागत केले. या वेळी ज्येष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी गौतम चोपडे उपस्थित होते. या वेळी रोहिदास हातागळे, गटशिक्षणाधिकारी रंगनाथ राऊत, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष बाळासाहेब बोर्डे, प्रकाश तोडकर, अनिल शिंदे, मुख्याध्यापिका मीना हजारे यांच्या हस्ते पहिलीतील मुलांना पाठ्यपुस्तके देण्यात आली.

माजलगाव : वर्गखोल्या फुगे अन् फुलांनी सजवल्या
तालुक्यातील जिल्हा परिषदेसह विविध संस्थांच्या शाळांत
बुधवारी प्रवेशोत्सवाच्या निमित्ताने वर्गखोल्या फुगे व फुलांनी सजवण्यात आल्या होत्या. तालुक्यातील काही शाळांत पहिलीत प्रवेश मिळवलेल्या चिमुकल्यांचे शिक्षकवृंदांना पुष्पगुच्छ देत टाळ्या वाजवून जोरदार स्वागत केले. सर्व शिक्षक हजर होते.

बीड : चिमुकल्यांना दिली गुलाबाची फुले, भेटवस्तू देऊन केला सत्कार
शहरातील धांडेनगरमधील रेणुकाई शिशुविहार प्राथमिक शाळेत उन्हाळी वर्ग शिबिरात विविध कलागुण स्पर्धेत यशस्वी ठरलेल्या विद्यार्थ्यांना बुधवारी भेटवस्तू देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी मुख्याध्यापक राजेंद्र वाघमारे, नारायणगड शिक्षण प्रसारक मंडळाचे व्यवस्थापक बाळासाहेब जगदाळे, ज्येष्ठ शिक्षक जगदीश करपे, कलाशिक्षक गणेश स्वामी आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...