आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करायेथील पोदार इंटरनॅशनल स्कूलमध्ये राष्ट्रीय विज्ञान दिवस उत्साहात साजरा केला. प्रमुख अतिथी म्हणून डॉ. शुभदा लोहिया आणि डॉ. सीमा लोमटे यांची उपस्थिती होती. मान्यवरांनी डाॅ. सी.व्ही. रमन यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन केले. मान्यवरांचा शाळेचे प्राचार्य किर्तीकुमार देशमुख यांनी मानचिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. कार्यक्रमाची सुरुवात शाळेतील शिक्षक सुशीलकुमार हतागळे यांनी स्वागतपर भाषणाने केली. त्यानंतर इयत्ता नववीतील विद्यार्थ्यांनी अंधश्रद्धा विरोधी नाटिका सादर केली.
डॉ. शुभदा लोहिया आणि डॉ. सीमा लोमटे यांनी आपल्या भाषणातून पर्यावरणाचे रक्षण आणि संवर्धन ही काळाची गरज असून, त्यात युवा पिढी आणि विद्यार्थ्यांचा सहभाग महत्वाचा आहे असे मत मांडले. त्यानंतर त्यांनी विद्यार्थ्यांना एक प्रकल्प सांगितला. ज्यात विद्यार्थ्यांनी त्यांच्या घरात असलेल्या प्लास्टिक बॅग, चॉकलेटचे रॅपर इ. व्यवस्थितपणे जमा करून प्रत्येक महिन्याला शाळेत आणून द्यायचे आहे. हे जमवलेले प्लास्टिक रिसायकलिंग साठी पाठवण्यात जाईल, जेणेकरून पर्यावरण प्रदूषण नियंत्रित करण्यासाठी आपला खारीचा वाटा राहील. या उपक्रमातून त्यांनी मुलांना सागर मित्र बनण्याचे आवाहन केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.