आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राष्ट्रीय संग्रहालय परिषद:सप्टेंबरमध्ये विज्ञान नाट्यमहोत्सव ; विज्ञान सल्लागार जे. व्ही. चौरे यांची माहिती

बीड4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राष्ट्रीय संग्रहालय परिषद, नेहरू विज्ञान केंद्र वरळी व शालेय शिक्षण विभागातर्फे दरवर्षी राज्यातील शालेय विद्यार्थ्यांसाठी विज्ञान नाट्यमहोत्सवाचे आयोजन केले जाते. विद्यार्थी, शिक्षक आणि जनसामान्यांना वैज्ञानिक माहिती, घटना आणि संकल्पना मनोरंजक पद्धतीने देता यावी. तसेच, मनोरंजनासोबतच समाजप्रबोधन व्हावे, या हेतूने १ ते १० सप्टेंबरदरम्यान जिल्हास्तरीय, १५ ते २५ सप्टेंबरदरम्यान विभागस्तरावर आणि १ ते १० ऑक्टोबरदरम्यान राज्यस्तरावर हा उत्सव होईल, अशी माहिती शिक्षण विभागातील विज्ञान सल्लागार जे. व्ही. चौरे यांनी दिली.

गेल्या दोन वर्षांत कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष असे व्यासपीठ अनुभवता आले नाही. परंतु आता सर्व काही सुरळीत झाल्याने पुन्हा एकदा नाट्यमहोत्सवाची संधी उपलब्ध झाली आहे. यंदाच्या नाट्यमहोत्सवासाठी “लसीकरणाची कथा’, “महामारी-सामाजिक व वैज्ञानिक समस्या’ जीवनमानाचा दर्जा उंचावण्यासाठी तंत्रज्ञानाचे नवकल्पना/ संशोधन’ आणि “मूलभूत विज्ञान व शाश्वत विज्ञान’ असे चार विषय देण्यात आले आहेेत. प्रत्येक तालुका, जिल्हास्तरीय स्पर्धा होईल. त्यानंतर दोन चमू विभाग स्तरासाठी निवडले जातील. यातून प्रथम येणारे नाटक राज्यस्तरीय स्पर्धेत सहभागी होऊ शकेल.

स्पर्धेचे नियम व अटी
{सहावी ते दहावीपर्यंतचे विद्यार्थी सहभागी होऊ शकतील.
{नाटक पूर्ण करण्यासाठी ३० मिनिटांचा अवधी
{मराठी, हिंदी किंवा इंग्रजीतून सादरीकरण करता येईल.
{एका नाटकात ८ विद्यार्थ्यांचा सहभाग हवा. ३ परीक्षक राहील.
{नाट्य सादरीकरणासाठी ५० गुण, वैज्ञानिक माहितीकरिता ३० गुण, विज्ञान नाट्याची परिणामकारकतेसाठी २० गुण.
{स्पर्धेतील विजेत्या संघास प्रथम बक्षीस २०००, द्वितीय १५०० आणि तृतीय १००० रुपये पारितोषिकाचे स्वरूप राहील.

बातम्या आणखी आहेत...