आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:‘माझ्या आयुष्यातील शेवटचा दिवस’ हे स्टेटस पाहून पोलिसाने आत्महत्येपासून केले परावृत्त

बीड3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

आर्थिक विंवचनेतील येथील सरकारी दवाखान्यातील एक कर्मचाऱ्याने बुधवारी (२४ ऑगस्ट) आपल्या साेशल मीडियावर इंग्रजी भाषेत ‘आज माझा आयुष्याचा शेवटचा दिवस आहे’ असे स्टेटस ठेवले होते. हे स्टेटस पोलिस जमादार स्वप्निल गुंड यांनी बुधवारी ६:३९ वाजता पाहिला होता. हा आरोग्य कर्मचारी कोणतेही टोकाचे पाऊल उचलू शकतो. ही परिस्थिती ओळखून पोलिस जमादार गुंड यांनी आरोग्य कर्मचाऱ्याला आत्महत्येपासून रोखण्यासाठी त्याच्या दुसऱ्या मोबाइलवर संपर्क केला असता ताे बंद हाेता. त्यामुळे गुंड यांनी पोलिस कर्मचाऱ्यांना साेशल मीडियावर त्याचा फोटो पाठवून शोध घेण्यास सांगितले.

तसेच डायल ११२ ला शोध घेण्यासाठी माहिती दिली. दरम्यान, सायबर सेलच्या पोलिस उपनिरीक्षक क्रांती टाकणे, पोलिस जमादार ए. व्ही. सुरवसे यांनी आरोग्य कर्मचाऱ्याचे लोकेशन मिळवले, तेव्हा त्याचे लोकेशन बीड तालुक्यातील कपिलधार ते मांजरसुंबादरम्यान दाखवत होते. लोकेशनच्या आधारे पोलिस जमादार स्वप्निल गुंड व रोहित शिंदे यांनी दुचाकीवरून जाऊन प्रथम बिंदुसरा प्रकल्प परिसरात शोध घेतला. परंतु, तो तिथे मिळून न आल्याने मांजरसुंबा महामार्ग पोलिसांना त्याची तातडीने माहिती देऊन फोटो पाठवून मांजरसुंबा ते बीडकडे मार्गावर शोध घेण्यासाठी सांगितले. महामार्ग पोलिसांनीही फोन केला असता त्याने उत्तर देत मी चाललो म्हणून फोन कट केला हाेता. त्याला बीड तालुक्यातील मांजरसुंबा येथील घाटात गाठून ताब्यात घेतले आणि आत्महत्येपासून रोखत त्याला घरी सुखरूप पोहोचवले. बीड पोलिसांच्या सतर्कतेमुळे शासकीय कर्मचाऱ्याचे प्राण वाचले.

पोलिसांनी तासाभरातच शोध घेतला, घरी आणून सोडले
महामार्ग पोलिसांना मांजरसुंबा घाटाजवळ निर्मनुष्य ठिकाणी ताे आरोग्य कर्मचारी दिसून आला. त्याला ताब्यात घेऊन आत्महत्येपासून परावृत्त केले. त्याची समजूत काढून घरी सुखरूप आणून सोडले. बीड पोलिस दलाच्या सतर्कतेमुळे अवघ्या एक तासात त्याचा शोध घेत आत्महत्या करण्यापासून त्याला परावृत्त केल्याने मोठा अनर्थ टळला.

बातम्या आणखी आहेत...