आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजळगाव येथे पार पडलेल्या ३२ व्या महाराष्ट्र राज्य ज्युनिअर तायक्वांदो स्पर्धेमध्ये बीडच्या नयन अविनाश बारगजे हिने ४९ किलो वजन गटात सुवर्णपदक पटकावले आहे. विशाखापट्टणम येथे होणाऱ्या राष्ट्रीय ज्युनिअर स्पर्धेसाठी तिची महाराष्ट्र राज्य संघात निवड झाली असल्याची माहिती राष्ट्रीय तायक्वांदो प्रशिक्षक डॉ. अविनाश बारगजे यांनी दिली. तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र या अधिकृत राज्य संघटनेच्या मान्यतेने जळगाव जिल्हा तायक्वांदो असोसिएशन आयोजित ३२ वी महाराष्ट्र राज्य ज्युनिअर तायक्वांदो स्पर्धा २५ ते २८ जानेवारी २०२३ दरम्यान जिल्हा क्रीडा संकुल, जळगाव पार पडली. या राज्य स्पर्धेत ३१ जिल्ह्यांमधून अधिकृत ३६० मुला-मुलींनी सहभाग नोंदवला. या स्पर्धेत बीड जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करताना मुलींच्या ४९ किलो वजनाच्या गटात कुमारी नयन अविनाश बारगजे हीने लागोपाठ सलग ४ सामने जिंकून सुवर्णपदक पटकावले.
रायगड, मुंबई, कोल्हापूर, पुणे जिल्ह्यातील खेळाडूंचा तीने पराभव केला. अंतिम फेरीमध्ये राष्ट्रीय खेळाडू सिद्धी जमदाडे ( पुणे) हीचा १२ गुणांच्या फरकाने पराभव करत सुवर्णपदक जिंकले व मुलींमध्ये महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ट खेळाडू होण्याचा पुरस्कार मिळवला. आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथे होणाऱ्या ३८ व्या राष्ट्रीय ज्युनिअर तायक्वांदो स्पर्धेसाठी नयन बारगजे हीची निवड झाली आहे. आंतरराष्ट्रीय खेळाडू अविनाश पांचाळ, राष्ट्रीय खेळाडू अमित मोरे, पारस गुरखुदे व देवेंद्र जोशी यांनी या खेळाडूंना स्पर्धेसाठी प्रशिक्षक म्हणून काम पाहिले तर अमृता गायकवाड (केज) हीने संघ व्यवस्थापक म्हणून काम पाहिले.
जिल्हा क्रीडा अधिकारी सुहासिनी देशमुख, अरविंद विद्यागर, क्रीडा अधिकारी पंडित चव्हाण, क्रीडा अधिकारी महेश खुटाळे , योगेश करांडे, कार्याध्यक्ष प्रा.डॉ. राजेश क्षीरसागर, जिल्हा संघटनेचे अध्यक्ष नितीनचंद्र कोटेचा, दिनकर चौरे , भारत पांचाळ, महीला प्रशिक्षीका जया बारगजे, बन्सी राऊत, मणेश बनकर, डॉ. विनोदचंद्र पवार, प्रा. पी टी चव्हाण, सुनील राऊत, प्रसाद साहू, पोलीस उपनिरीक्षक युवराज पोठरे, अविनाश पांचाळ, नवीद शेख, सचिन जायभाये, डॉ शकील शेख, उज्वल गायकवाड, नितीन आंधळे, बालाजी कराड, अमित मोरे, सचिन कातांगळे, अनीस शेख, शुभम खिल्लारे, कृष्णा उगलमुगले, सुशांत सोन्नर, सुरज देशमुख आदींनी राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.