आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‎ कॉलेज ऑफ‎ फार्मसी:मुलाखतीत 10 विद्यार्थ्यांची निवड‎

अंबाजोगाई‎एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

अंबाजोगाई येथील श्री बालाजी‎ शिक्षण प्रसारक मंडळ अंबाजोगाई‎ च्या कॉलेज ऑफ फार्मसी येथे‎ कॅम्पस प्लेसमेंटचे आयोजन करण्यात‎ आले होते. कॅम्पस मुलाखतीद्वारे‎ महाविद्यालयाच्या दहा विद्यार्थ्यांची‎ निवड करण्यात आली.‎ श्री बालाजी शिक्षण प्रसारक मंडळ‎ संचलित बी. फॉर्मसी व इंस्टिटयुट‎ ऑफ फॉर्मसी या महाविद्यालयात २९‎ डिसेंबर २०२२ रोजी महाविद्यालयाच्या‎ कॅम्पस प्लेसमेंट विभागा तर्फे‎ मेडिसेज ई-लर्निंग प्रा. लि. यांच्या‎ विद्यमाने ‘फिल्ड मेडिकल‎ असोसिएट्स’ या पदासाठी पूल‎ कॅम्पस ड्राइव्हचे आयोजन करण्यात‎ आले होते.

या प्रसंगी मेडिसेज‎ ई-लर्निंगचे रिजनल बिझनेस मॅनेजर‎ मनोज देशपांडे हे या भरती प्रक्रीये‎ साठी मुलाखती घेण्यास उपस्थित‎ होते. याप्रसंगी उपस्थित सर्व‎ अधिकाऱ्यांचे प्राचार्या डॉ. मृणाल‎ शिरसाट यांनी स्वागत केले.‎ महाविद्यालयातील या कार्यक्रमात ‘प्री‎ प्लेसमेंट टॉक’ या संबंधी बोलताना‎ मनोज देशपांडे यांनी कंपनी बद्दल‎ तसेच पद व पदाची कार्य पध्दती‎ सांगितली. हा जॉब कसा‎ परिणामकारक व उपयुक्त आहे‎ याबद्दलही देशपांडे यांनी सखोल‎ मार्गदर्शन केले. कॅम्पस प्लेसमेंटच्या‎ मुलाखतीत मौखिक परिक्षा घेऊन‎ त्यामधून दहा विद्यार्थ्यांची निवड‎ करण्यात आली.

या कॅम्पस मुलाखती‎ साठी महाविद्यालयाचे एकंदर ३०‎ विद्यार्थी प्लेसमेंट मुलाखतीकरीता‎ उपस्थित होते. महाविद्यालयाच्या या‎ उपक्रमा बद्दल व विद्यार्थ्यांच्या‎ सहभाग आणि यशस्वी सर्व‎ विद्यार्थ्यांचे श्री बालाजी शिक्षण‎ प्रसारक मंडळाचे सचिव राजकिशोर‎ मोदी, अध्यक्ष भूषण मोदी, संस्थेचे‎ कार्यकारी संचालक संकेत मोदी,‎ महाविद्यालयाचे प्राचार्या डॉ. मृणाल‎ शिरसाट, शैक्षणिक प्रभारी डॉ. तरके‎ संतोष व झांबरे कृष्णा प्लेसमेंट‎ विभाग प्रमुख साखरे विशाल व गित्ते‎ संभाजी अादींनी अभिनंदन केले.‎

बातम्या आणखी आहेत...