आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्रीडा:महिला महाविद्यालयाच्या अंजना चव्हाणची‎ पश्चिम विभागीय क्रीडा स्पर्धेसाठी निवड‎

गेवराई5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जय भवानी शिक्षण प्रसारक मंडळाच्या‎ गेवराई येथील महिला महाविद्यालयाची खेळाडू‎ अंजना चव्हाण हिची पश्चिम विभागीय क्रीडा‎ स्पर्धेसाठी निवड झाली आहे. अंजना चव्हाण हिने‎ डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या‎ बीड येथे झालेल्या आंतरमहाविद्यालयीन क्रीडा‎ स्पर्धेत भाला फेक या क्रीडा प्रकारात द्वितीय स्थान‎ मिळवल्यामुळे विभागीय स्पर्धेसाठी ती पात्र ठरली‎ आहे.

विद्यापीठात होणाऱ्या विभागीय स्पर्धेत ती‎ चमकदार कामगिरी करील अशी अपेक्षा व्यक्त‎ केली जात आहे. प्रशिक्षक म्हणून महाविद्यालयाचे‎ क्रीडा विभाग प्रमुख प्रा. डॉ. प्रविण शिलेदार यांचे‎ मार्गदर्शन लाभले आहे. त्यांचे संस्थापक‎ शिवाजीराव पंडित, अध्यक्ष अमरसिंह पंडित,‎ सचिव जयसिंग पंडित, विजयसिंह पंडित, रणवीर‎ पंडित, प्राचार्य डॉ. कांचन परळीकर, प्रशासकीय‎ अधिकारी प्रमोद गोरकर यांनी स्वागत केले

बातम्या आणखी आहेत...