आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवड‎:शालेय कराटे स्पर्धेसाठी जिल्हा़-शहर‎ कराटे-डो असो च्या खेळाडूंची निवड‎

बीड2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

दि.२ ते ३ फेब्रुवारी रोजी जिल्हा क्रीडा‎ संकुल या ठिकाणी क्रीडा व युवक सेवा‎ संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे यांच्याद्वारे‎ आयोजित विभागीय शालेय कराटे स्पर्धा झाल्या. या‎ स्पर्धेत १४ वर्षाखालील मुलांत अर्जुन थिगळे,‎ आर्यन थिगळे, 17 वर्षाखालील मुलांत पवन‎ जोगदंड व १९ वर्षाखालील ऋषिकेश बेदरे, रोहन‎ नेमाने या खेळाडूंनी प्रथम क्रमांक मिळवला.

पुणे या‎ ठिकाणी होणार्‍या राज्यस्तरीय स्पर्धेकरिता या‎ सर्वांनी आपले स्थान निश्चित केले आहे. खेळाडूंना‎ सेन्साई उत्तरेश्वर सपाटे यांचे मार्गदर्शन लाभले.‎ उत्तरेशवर सपाटे यांच्या मार्गदर्शनाखाली खेळाडू‎ सराव करत आहेत. यशस्वी विद्यार्थ्यांच्या‎ कामगिरीबद्दल जिल्हा क्रीडा अधिकारी सुहासिनी‎ देशमुख व शिखर पब्लिक स्कूलचे संचालक‎ अ‍ॅड.बळवंत कदम व शिखर पब्लिक स्कूलच्या‎ मुख्याध्यापिका अ‍ॅड.आशा कदम, डॉ.नितीन‎ सोनवणे, माजी सैनिक खंडु जगताप यांनी खेळाडूंचे‎ अभिनंदन केले आहे.‎

बातम्या आणखी आहेत...