आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासाळेगाव ( ता. केज ) येथील ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी गणेश मरीबा गालफाडे यांची निवड करीत अनुसूचित जाती प्रवर्गाला प्रतिनिधित्व करण्याची संधी सरपंच कैलास पाटील यांनी दिली आहे. साळेगाव येथील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत भाजपचे जेष्ठ नेते रमेश आडसकर यांच्या नेतृत्वाखाली बहुजन रयत परिषदेचे प्रदेशाध्यक्ष रमेश गालफाडे, विद्यमान सरपंच कैलास पाटील यांनी ग्रामविकास पॅनल उभा केला होता. सरपंच पदाची निवडणूक लढवून सरपंच कैलास पाटील हे पुन्हा निवडून आले आहेत. तर त्यांच्या ग्रामविकास पॅनलचे सर्वाधिक उमेदवार निवडून आले.
याच पॅनलमधून सदस्य पदासाठी मरीबा गालफाडे हे खुल्या प्रवर्गातून निवडून आले होते. उपसरपंच पदासाठी या पॅनलमधील अनेक जण इच्छूक असताना सरपंच कैलास पाटील यांनी अनुसूचित जाती प्रवर्गाला प्रतिनिधित्व करण्याची संधी देण्याच्या उद्देशाने गणेश गालफाडे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करीत उपसरपंच पदाची माळ त्यांच्या गळ्यात घातली. उपसरपंच निवडीसाठी ग्रामसेवक ओम चोपणे यांच्यासह ग्रामपंचायतीचे सदस्य उपस्थित होते. या ग्रामपंचायतीवर भाजपचे वर्चस्व प्रस्थापित झाले आहे. दरम्यान, येणाऱ्या काळात गावाच्या विकासासाठी प्रयत्न करणार असल्याचे नूतन पदाधिकाऱ्यांनी याप्रसंगी सांगितले. यावेही ग्रामस्थांचीही उपस्थिती होती.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.