आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवड‎:गेवराईच्या वैभवीची‎ कबड्डी स्पर्धेसाठी निवड‎

गेवराई‎एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

गेवराई येथील महिला‎ महाविद्यालयाची खेळाडू वैभवी‎ बिरादार हिची पश्चिम विभागीय‎ आंतर विद्यापीठ कबड्डी महिला ‎स्पर्धेसाठी निवड झाली असून तिचे ‎सर्वत्र अभिनंदन होत आहे.‎ महिला महाविद्यालयाची खेळाडू वैभवी बिरादार ची डॉ. बाबासाहेब‎ आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या‎ कबड्डी प्रशिक्षणासाठी निवड होऊन‎ तिचा विद्यापीठाच्या संघात समावेश‎ करण्यात आला असुन तिची‎ आंतरविद्यापीठ कबड्डी स्पर्धेसाठी‎ निवड झाली.‎

विद्यापीठाच्या क्रीडा विभागाचे‎ संचालक डॉ. बडवणे यांनी दि. १३‎ ऑक्टोबर २०२२ रोजी आदेश‎ निर्गमित करून विद्यापीठाच्या‎ महिला कबड्डी संघात वैभवी‎ बिरादारचा समावेश झाला‎ असल्याचे कळवले आहे. येत्या ६‎ नोव्हेंबर ते १० नोव्हेंबर या काळात‎ अमरावतीच्या संत गाडगेबाबा‎ विद्यापीठामध्ये होणाऱ्या पश्चिम‎ विभागीय आंतर विद्यापीठ महिला‎ कबड्डी स्पर्धेसाठी हा संघ रवाना होत‎ असून या स्पर्धेत चांगली कामगिरी‎ करील अशी अपेक्षा व्यक्त केली‎ जात आहे. वैभवी बिरादार हिला‎ प्रशिक्षक म्हणून महाविद्यालयाचे‎ क्रीडा विभाग प्रमुख प्रा. डॉ. प्रविण‎ शिलेदार यांचे मार्गदर्शन मिळाले‎ आहे.

या यशाबद्दल जय भवानी‎ शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक‎ तथा माजी मंत्री शिवाजीराव पंडित,‎ अध्यक्ष अमरसिंह पंडित, सचिव‎ जयसिंग पंडित, विजयसिंह पंडित,‎ युवा नेते रणवीर पंडित,‎ महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ.‎ कांचन परळीकर, प्रशासकीय‎ अधिकारी प्रमोद गोरकर,‎ महाविद्यालयाचे प्राध्यापक कर्मचारी‎ यांनी अभिनंदन केले आहे.‎

बातम्या आणखी आहेत...