आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विद्यार्थ्याचा सत्कार:राज्यस्तरीय वेटलिफ्टिंग‎ स्पर्धेसाठी रितेश शिंदेची निवड‎

बीड‎3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

विभागीय शालेय वेटलिफ्टिंग‎ स्पर्धेमध्ये सैनिकी विद्यालयाच्या‎ रितेश शिंदे याने प्रथम क्रमांक‎ पटकावला आहे. राज्यस्तरीय‎ शालेय वेटलिफ्टिंग स्पर्धेसाठी‎ विभागीय संघात त्याची निवड‎ झाली असल्याची माहिती सैनिकी‎ विद्यालयाचे प्राचार्य एस ए डाके‎ यांनी दिली.‎ क्रीडा व युवक सेवा‎ संचालनालय, जिल्हा क्रीडा‎ अधिकारी कार्यालय बीड यांच्या‎ संयुक्त विद्यमाने बीड जिल्हा क्रीडा‎ संकुल येथे विभागीय शालेय‎ वेटलीफ्टींग स्पर्धा पार पडली.‎ सैनिकी विद्यालयातील खेळाडू‎ रितेश शिंदे याने ९० किलो वरील‎ वजनामध्ये प्रथम क्रमांक‎ पटकावला. सांगली येथे होणाऱ्या‎ राज्यस्तरीय शालेय वेटलिफ्टिंग‎ स्पर्धेमध्ये तो औरंगाबाद विभागाचे‎ प्रतिनिधित्व करणार आहे.सैनिकी‎ विद्यालयाच्या खेळाडूंनी यावर्षी‎ खो-खो, तायक्वादो, मैदानी अशा‎ अनेक क्रीडा प्रकारांमध्ये वर्चस्व‎ राखले आहे.‎

या विद्यार्थ्यांना क्रीडा शिक्षक‎ डॉ. अविनाश बारगजे व डॉ.‎ विनोदचंद्र पवार यांचे मार्गदर्शन‎ लाभले आहे. रितेश शिंदे यांच्या‎ निवडीबद्दल माजी मंत्री जयदत्त‎ क्षीरसागर, संस्थेचे सचिव डॉ.‎ भारतभूषण क्षीरसागर, डॉ. दीपा‎ क्षीरसागर, डॉ. योगेश क्षीरसागर,‎ डॉ. राजू म्हणाले, जिल्हा क्रीडा‎ अधिकारी सुहासिनी देशमुख,‎ वेटलिफ्टिंग संघटनेचे अर्शियान‎ शेख, उज्वल गायकवाड, प्राचार्य‎ डाके एस ए, सर्व प्राध्यापक,‎ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी‎ आदींनी शुभेच्छा देऊन रितेशचे‎ अभिनंदन केले आहे.‎

बातम्या आणखी आहेत...