आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवड‎:परिसर मुलाखतीत कॉलेज ऑफ‎ फार्मसीच्या दहा विद्यार्थ्यांची निवड‎

अंबाजोगाई‎एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई येथील मेडिसेज ई लर्निंग‎ प्रा.लि.च्या वतीने अंबाजोगाई येथील‎ श्री बालाजी शिक्षण प्रसारक मंडळ‎ अंबाजोगाईच्या कॉलेज ऑफ‎ फार्मसी येथे कॅम्पस प्लेसमेंटचे‎ आयोजन करण्यात आले होते. या‎ कॅम्पस प्लेसमेंट मधील आयोजित‎ मुलाखती द्वारे महाविद्यालयाच्या‎ दहा विद्यार्थ्यांची निवड करण्यात‎ आली.‎ बी. फॉर्मसी व इंस्टिटयुट ऑफ‎ फॉर्मसी या महाविद्यालयात २९‎ डिसेंबर रोजी महाविद्यालयाच्या‎ कॅम्पस प्लेसमेंट विभागातर्फे‎ मेडिसेज ई-लर्निंग प्रा.लि.मुंबई‎ यांच्या विद्यमाने ‘फिल्ड मेडिकल असोसिएट्स’या पदासाठी पूल‎ कॅम्पस ड्राइव्हचे आयोजन करण्यात ‎ आले होते.

या प्रसंगी मेडिसेज ई-लर्निंगचे रिजनल बिझनेस मॅनेजर ‎मनोज देशपांडे हे या भरती‎ प्रक्रीयेसाठी मुलाखती घेण्यास‎ उपस्थित होते. याप्रसंगी उपस्थित अधिकाऱ्यांचे प्राचार्या डॉ.‎ मृणाल शिरसाट यांनी पुष्पगुच्छ‎ देऊन स्वागत केले. मनोज देशपांडे‎ यांनी पद व पदाची कार्य पध्दती‎ सांगितली. हा जॉब कसा‎ परिणामकारक व उपयुक्त आहे,‎ याबद्दलही देशपांडे यांनी सखोल‎ ‎मार्गदर्शन केले. कॅम्पस प्लेसमेंटच्या‎ मुलाखतीत मौखिक परिक्षा घेऊन‎ त्यामधून दहा विद्यार्थ्यांची निवड‎ करण्यात आली. या कॅम्पस‎ मुलाखती साठी महाविद्यालयाचे‎ एकंदर ३० विद्यार्थी प्लेसमेंट‎ मुलाखतीकरीता उपस्थित होते.‎ यशस्वी सर्व विद्यार्थ्यांचे मंडळाच्या‎ वतीने अभिनंदन करण्यात आले.‎

बातम्या आणखी आहेत...