आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अध्यादेश पारित:सोनपेठमध्ये वरपुडकर महाविद्यालयात‎ राष्ट्रीय शैक्षणिक धोरण विषयावर चर्चासत्र‎

सोनपेठ2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील कै. रमेश वरपुडकर महाविद्यालय‎ सोनपेठ येथे नवीन शैक्षणिक धोरण २०२० या विषयावर‎ एक दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात‎ आले होते. उद्घाटन सत्राच्या अध्यक्षस्थानी बापुराव‎ भुसारे , तर उद्घाटक रामेश्वर कदम उपस्थित होते.‎ भगवानराव मोहिते, प्राचार्य डॉ. बी. एम. गोरे, प्राचार्य‎ डॉ.वसंत सातपुते, प्राचार्य डॉ. ए. वाय. दळवे, प्राचार्य‎ डॉ. एच.पी. कदम हे उपस्थित होते.

राष्ट्रीय स्तरावर‎ नवीन शैक्षणिक धोरण लागू करण्यात संदर्भात‎ सरकारने अध्यादेश पारित केले आहेत. त्याप्रमाणे या‎ नवीन धोरणाच्या संदर्भाने कशा पद्धतीने शैक्षणिक‎ संस्थांनी सामोरे जावे यासाठी नवीन शैक्षणिक धोरण‎ लागू करण्या समोरील आव्हाने या विषयावर स्वामी‎ रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या विद्या परिषदेचे‎ सदस्य प्रा. डॉ. डी. एन. मोरे यांनी व्याख्यान दिले. तर‎ नवीन शैक्षणिक धोरणातील विविध पैलू या विषयावर‎ सागर येथील यूजीसी एचआरडीसी चे डायरेक्टर,‎ प्राचार्य डॉ. आर.टी. बेद्रे यांनी मार्गदर्शन केले.‎

बातम्या आणखी आहेत...