आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परिसंवाद‎:नव्या युगाची शेती बाबत अंबाजोगाई येथे परिसंवाद‎

अंबाजोगाई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांच्या‎ १७ फेब्रुवारी २०२३ रोजी होणाऱ्या सन्मान‎ सोहळ्याच्या निमित्ताने ‘नव्या युगाची शेती’ या‎ विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला आहे.‎ या परिसंवादात कृषी ऊर्जेच्या संभावना या‎ विषयावर डॉ.प्रशांत शिनगारे, (पुणे) विचार मांडणार‎ आहेत.

तसेच ‘जनुकीय परावर्तित बियाणे’ या‎ विषयावर डॉ.विलास पारखी (ग्रुप लीडर‎ महिको,जालना), ‘नैसर्गिक शेतीचे बलस्थानं’ या‎ विषयावर डॉ.कल्याणराव आपेट, (वनस्पती‎ रोगशास्त्र, कृषी विद्यापीठ, परभणी) तर ‘सेंद्रिय‎ शेतीची मर्यादा’ या विषयावर दिलीप चव्हाण‎ (जनरल मॅनेजर राजदीप फाॅस्पेट इंडिया लि.पुणे)‎ आदी तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. हा परिसंवाद‎ १७ फेब्रुवारी रोजी ११ वाजता आंबाजोगाईच्या‎ मुकुंदराज सभागृहात होईल.‎

बातम्या आणखी आहेत...