आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आंदोलन:केजमध्ये वीज कंपनीविरुद्ध सेनेचे बोंबा मारो आंदोलन

केज2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पिकविमा कंपनीच्या दादागिरीविरोधात व शेतकऱ्यांची सक्तीने वीज तोडणी बंद करण्यात यावी या मागणीसाठी केज तालुका शिवसेनेच्या वतीने गुरुवारी सकाळी तहसील कार्यालयाच्या प्रवेशद्वारात बोंब मारो आंदोलन करण्यात आले.

यावेळी नायब तहसीलदार आशा वाघ यांनी मागण्याचे निवेदन स्वीकारले. आंदोलनात शिवसेना तालुका प्रमुख रत्नाकर शिंदे, उपजिल्हाप्रमुख दिपक मोराळे, युवा सेना तालुका प्रमुख अरविंद थोरात, जिल्हा सहसंघटक अभिमान पटाईत, तालुका सचिव रामहरी कोल्हे, सुनील पटाईत, विशाल कोकाटे, ज्ञानेश्वर बोबडे, अमोल चौधरी, राहुल फुके, माजी उपसभापती शशिकांत तारळकर, विक्रम देशमुख, आत्माराम घाडगे आदी सहभागी झाले होते.

बातम्या आणखी आहेत...