आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराज्यातील महिला व शाळकरी मुलींना महाराष्ट्र ग्रामीण जीवन्नोनती अभियानच्या माध्यमातून अस्मिता योजनेतून अल्पदरात दिल्या जाणाऱ्या सॅनिटरी पॅडचा पुरवठा थांबलेला आहे. याबाबत दिव्य मराठीने वृत्त प्रकाशीत केल्यानंतर केजच्या आमदार नमिता मुंदडा यांनी शासनाला पत्र पाठवले होते यावर ग्रामीण जीवन्नोनती अभियानच्या संचालकांनी उत्तर दिले असून सुधारित आराखडा शासनाच्या मान्यतेसाठी पाठवल्याचे सांगितले आहे.
ग्रामीण भागातील महिला व शाळकरी मुलींना मासिक पाळीच्या काळात सॅनिटरी पॅड उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे त्यांना कपड्याचा वापर करावा लागतो. शाळकरी मुली या काळात शाळेतही जात नाहीत. त्यांचे शैक्षणिक नुकसान होतेच मात्र अस्वच्छतेमुळे आरोग्याच्या समस्याही निर्माण होतात. त्यामुळे ग्रामीण महिला व शाळकरी मुलींना अल्पदरात सॅनिटरी पॅड उपलब्ध करुन देण्यासाठी तत्कालीन ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या पुढाकारातून २०१८ मध्ये अस्मिता योजना सुरु केली गेली होती.
बचत गटांच्या महिलांमार्फत या पॅडची गाव पातळीवर विक्री केली जात होती. त्यामुळे बचत गटातील महिलांनाही काही उत्पन्न मिळत होते दरम्यान, राज्यात कोविडनंतर या योजनेला ग्रहण लागले अन् मार्च २०२२ पासून ही योजना पूर्णपणे बंद पडली आहे पुरवठादारांनी कराराचे नुतणीकरन केलेले नाही. त्यामुळे ग्रामीण भागातील महिलांना पॅड मिळेनासे झाले आहेत. दरम्यान, दिव्य मराठीने ही बाब समोर आणली होती. या प्रकरणी केजच्या भाजप आमदार नमिता मुंदडा यांनी अभियानच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना पत्र लिहले होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.