आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवडणक:सेवा सहकारी सोसायटीची निवडणूक पार ; अंबिल वडगाव, बाळापूर, कुंभारी सेवा सहकारी सोसायटी शिवसंग्रामच्या ताब्यात

बीडएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शिवसंग्रामचे राष्ट्रीय अध्यक्ष आ. विनायकराव मेटे यांच्या उपस्थिती मध्ये आंबीलवडगाव , बाळापूर, कुंभारी सेवासहकारी सोसायटी ऋषिकेश सुरवसे व रायचंद कापसे यांच्या पुढाकाराने शिवसंग्रामच्या ताब्यात आली.

यावेळी सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन , व्हाईस चेअरमन व सदस्य या सर्वांचा शिवसंग्राम भवन बीड येथे स्वागत करण्यात आले. याप्रसंगी उपस्थित शिवसंग्रामचे जिल्हाध्यक्ष नारायण काशीद शिवसंग्रामचे सरचिटणीस अनिल घुमरे , ऊसतोड कामगार नेते बबनराव माने, बीड शहराध्यक्ष अॅड. राहुल मस्के ,नेकनूर पंचायत जिल्हा परिषद गटाचे प्रमुख विनोद कवडे ,प्रविण सुरवसे, मागदे, कैलास शेजाळ, आदी पदाधिकरी उपस्थित होते.

शिवसंग्रामचे नेते रायचंद कापसे व ऋषिकेश सुरवसे हे शिवसंग्राम व आमदार विनायकराव मेटे यांच्या माध्यमातून विविध विकास कामे मार्गे लावत असतानाच, नुकतीच सेवा सहकारी सोसायटीची निवडणूक पार पडली. या निवडणुकीचा नुकताच निकाल जाहीर झाला व ही सेवा सहकारी सोसायटी संपूर्णपणे शिवसंग्रामच्या ताब्यात आली.

शिवसंग्राम भवन बीड येथे सर्व सोसायटीचे पदाधिकारी व सदस्यांचे स्वागत करण्यात आले सर्व सदस्य पुढील प्रमाणे चेअरमन अर्जुन बाजीराव जाधव, व्हाईस चेअरमन शहाजी सुरवसे , संचालक वैजंताबाई त्र्यंबक कापसे , बाबुराव केमधरे ,भागीरथीबाई सुरवसे , जालिंदर गालफाडे, नवनाथराव कुलकर्णी, सखाराम शिंदे, तसेच सचिव म्हणून बाळासाहेब सुरवसे व राजाभाऊ शिंदे तसेच गावातील प्रमुख उपस्थिती म्हणून अशोक कडवकर, बाळासाहेब पायाळ, सतीश पायाळ, बंडू खराडे, कैलास पायाळ , गजानन पानसरे , भाऊसाहेब सुरवसे , भिमराव पायाळ, अक्षय सुरवसे , सचिन खराडे आदी मंडळी बहुसंख्येने उपस्थित होती.

बातम्या आणखी आहेत...