आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चोरीला:जप्त केलेला साडेसातशे ब्रास वाळूसाठा चोरीला

बीड2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

वाळू चोरी करताना पकडून जप्त केलेली साडेसातशे ब्रास वाळू चोरी गेल्याचा प्रकार समोर आला. या प्रकरणी चकलांबा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला. गेवराई तालुक्यात वाळू माफियांची प्रशासनावर असलेली शिरजोरी सुरुच आहे.

यापूर्वी वाळूचे जप्त ट्रॅक्टर पळवून नेल्याचा प्रकार घडला होता. तर, आता जप्त केलेला वाळू साठाच गायब केला आहे. महसूल विभागाने कारवाई करुन राक्षसभूवन येथे ७५० ब्रास वाळू साठा जप्त केला हाेता.

गावातच हा साठा होता. दरम्यान, वाळू माफियांनी रात्रीतून हा साठा गायब केला. हा प्रकार समोर आल्यानंतर तलाठी पिराजी वाठोरे यांनी चकलांबा पोलिस ठाण्यात तक्रार दिली यावरुन अज्ञाताविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलिस अधिक तपास करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...