आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गणेशमूर्ती निर्मिती:अकराशे चिमुकल्यांनी साकारले शाडूचे बाप्पा ; उमेश डोंगे यांच्याकडुन प्रशिक्षण

अंबाजोगाई4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील रोटरी क्लब आणि स्वामी विवेकानंद बाल विद्या मंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित गणेशमूर्ती निर्मिती कार्यशाळेत अकराशे मुलांनी उत्साहाने सहभाग घेतला.शनिवारी स्वामी विवेकानंद बाल विद्या मंदिराच्या मैदानावर चित्रकार उमेश डोंगे यांनी शाडूच्या मातीपासून गणपती बनविण्याचे प्रशिक्षण मुलांना दिले. या वेळी ११०० बालकांनी मूर्ती बनवल्या. रोटरी क्लबचे मोईन शेख, सचिव भीमाशंकर शिंदे, जगदीश जाजू, गोरख मुंडे, एस. के. निर्मळे, रूपेश चव्हाण, राधेश्याम लोहिया, रूपेश रामावत, संतोष कुलकर्णी, स्वरूपा दिग्रसकर उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...