आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करास्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवा निमित्त आयोजित करण्यात येणाऱ्या विविध कार्यक्रमांपैकी शाहिरी महोत्सव; या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. सदरील शाहीरी महोत्सव सांस्कृतिक कार्य मंत्री अमित विलासराव देशमुख यांच्या संकल्पनेतून बीड शहरातील यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे शुक्रवार दि. १७ ते १९ जून या कालावधीत सायंकाळी ५ ते १० या वेळेत आयोजित करण्यात आला होता. या शाहीरी महोत्सवाने बीडचे रसिक मंत्रमुग्ध झाले.
बीड शहरातील यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे या शाहीरी महोत्सव झाला. या या शाहीरी महोत्सवाचे उदघाटन जेष्ठ साहित्यिक डॉ. सतिष साळुंके, सहसंचालक सांस्कृतिक कार्य संचालनालयचे श्रीराम पांडे, डॉ. सुधीर निकम, कार्यक्रम अधिकारी सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संदीप बलखंडे, शाहीर सीमा पाटील, शाहीर सुरेश जाधव, शाहीर राजा कांबळे, वामन माळी,डॉ.संतोष वारे, प्रवीण वडमारे, मुकुंद धुताडमल, पत्रकार संपादक सुनिल डोंगरे यांच्या प्रमुख उपस्थितीत या शाहीरी महोत्सवाचे उदघाटन करण्यात आले.
महाराष्ट्रातील वीरांचा व थोरांचा क्रांती प्रवास या महोत्सवातून सादर करण्यात आला. लोककलेतील एक महत्त्वाचा कलाप्रकार म्हणून पाहिल्या जाणाऱ्या; शाहिरी या कला प्रकाराचे जतन- संवर्धन व्हावे आणि युवा शाहीर निर्माण व्हावेत यासाठी या महोत्सवाचे आयोजन करण्यात आलेले आहे. तीन दिवस चालणाऱ्या या कार्यक्रमात शाहिरी पोवाडा या बरोबरच इतर लोककलांचे हे सादरीकरण होणार आहे. शहरी भागापासून ते ग्रामीण भागापर्यंत शाहिरी कला फार मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध आहे.
ग्रामीण भागातील रसिक प्रेक्षकांचे आजही या कलेच्या माध्यमातून मनोरंजन होत असते.आधुनिक युगात लोप पावत चाललेल्या लोककलांचे जतन व संवर्धन होण्याच्या दृष्टीने तसेच समृद्ध लोककलेला व लोककलावंतांना हक्काचे व्यासपीठ मिळावे यासाठी हा शाहीरी महोत्सव आयोजित करण्यात आलेला आहे. दम्यान सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांच्या संकल्पनेतून हा महोत्सव पार पडतो आहे. अशी माहिती बिभिषण चवरे, संचालक सांस्कृतिक कार्य संचालनालय यांनी दिली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.