आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मार्गदर्शन:शाहू महाराज आरक्षण, लोकशिक्षणाचे जनक; माजी नगराध्यक्ष मोदी यांनी मांडले विचार

अंबाजोगाई10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

लोकनेते छत्रपती राजर्षी शाहू महाराज हे खऱ्या अर्थाने आरक्षण तसेच महिला व विद्यार्थ्यांच्या मूलभूत शिक्षणाचे जनक आहेत, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी यांनी केले.

अंबाजोगाई येथे छत्रपती शाहू महाराजांच्या पुण्यतिथी निमित्ताने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. याप्रसंगी राजकिशोर मोदी यांच्यासह महादेव आदमाने, प्रवीण जायभाय, राणा चव्हाण, सय्यद ताहेर, विशाल पोटभरे, खलील जाफरी, अजीम जरगर यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमात प्रथमतः लोकराजा छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांना वंदन करण्यात आले. पुढे बोलताना मोदी म्हणाले, बहुजन समाजाला गुलामगिरीच्या जोखडातून काढून त्यांना स्वाभिमानाचे जीवन देणारे असे थोर व्यक्तिमत्त्व शाहू महाराजांचे होते. त्यांची ख्याती ही आरक्षणाचे जनक, थोर समाजसुधारक, रयतेचे राजे, समतावादी लोकराजे, राज्याच्या सर्वांगीण विकासाचे सर्वोत्तम उदाहरण घालून देणारे आदर्श शासनकर्ते अशी होते. बहुजनांमध्ये प्रचंड आत्मविश्वास निर्माण करणारे, द्रष्टे समाजसुधारक, पुरोगामी विचारांचे पुरस्कर्ते ही त्यांची स्वभाववैशिष्ट्ये होती, असेही मोदी यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...