आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गौरव:शक्ती प्रतिष्ठानचे शिक्षक पुरस्कार जाहीर ; सकाळी 11 वाजता पुरस्कार वितरित

बीड15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

गेल्या ३० वर्षापासून सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या शक्ती प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षी जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या शिक्षकांना प्रतिष्ठानच्या वतीने आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरविण्यात येते.सीएस डॉ. सुरेश साबळे व शिक्षणाधिकारी श्रीकांत कुलकर्णी, माजी मुख्याध्यापिका सुनंदा कुलकर्णी यांच्या उपस्थितीत ११ सप्टेंबर रोजी स्काऊट भवन येथे सकाळी ११ वाजता पुरस्कार वितरण होईल. यावर्षीचे आदर्श शिक्षक पुरस्कार जोशी चंद्रकांत विठ्ठलराव (गुरुकुल इंग्लिश स्कूल), कोळपकर आशा मुरलीधर (छत्रपती शाहू प्रा.विद्यालय), कदम गोविंद पांडुरंग (जि.प. प्रा. शाळा जरेवाडी), जाधवर प्रभावती दशरथ (जि. प.प्रा.शाळा कोठारबन), जाधव एल.बी. (संस्कार विद्यालय), प्रा.साळुंखे नामदेव विठ्ठल (सैनिकी विद्यालय बीड), गोसावी आर. व्ही.( चंपावती विद्यालय बीड) यांना जाहीर झाले आहेत.

त्याच बरोबर यंदा उपक्रमशील संस्थाचालक हा पुरस्कार अखिलेश ढाकणे यांना तर सामाजिक क्षेत्रातील कार्याबद्दल सिद्धार्थ सोनवणे यांना विशेष पुरस्कार जाहीर झाला. शक्ती प्रतिष्ठानच्यावतीने घेण्यात येणाऱ्या रंगभरण व निबंध स्पर्धेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा देखील याच कार्यक्रमात पार पडणार असून यावेळी उपस्थितीचे आवाहन शक्ती प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...