आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

शरद पवारांवरील आक्षेपार्ह विधान:भाजप आमदार गोपीचंद पडळकरांवर बीडमध्ये गुन्हा दाखल, राष्ट्रवादी युवक प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख यांची तक्रार

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
Advertisement
Advertisement

राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्यावर आक्षेपार्ह विधान करत टीका करणार्‍या भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात शिरुर कासार (बीड) पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला आहे. शिरुर कासार येथे राष्ट्रवादी युवक प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख यांनी आमदार गोपीचंद पडळकर यांच्या प्रतिमेला जोडे मारत आणि प्रतिमा जाळत आंदोलन केले होते. 

शरद पवार यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केल्यामुळे राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. अजूनही राज्यात ठिकठिकाणी गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमकतेने आंदोलन करत आहे.

Advertisement
0