आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार:माजी मंत्री पंडित यांच्या हस्ते शशिकांत कुलथेंचा सत्कार

गेवराई23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीड जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्रात अग्रेसर राहून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी काम करणाऱ्या शशिकांत कुलथे यांना नुकताच राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार देण्यात आला. त्याबद्दल शिवसेना नेते माजी राज्यमंत्री बदामराव पंडित यांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन कुलथे यांचा सत्कार केला. याप्रसंगी कैलास राठोड, सुनील कांडेकर यांची प्रमुख उपस्थिती होती. माजी मंत्री बदामराव पंडीत म्हणाले, कुलथे यांनी आपल्या कौशल्याने शैक्षणिक क्षेत्रात तसेच विद्यार्थ्यांच्या मनावर वेगळी छाप पाडली.

आपल्या विद्यार्थ्यांना अधिकाधिक ज्ञान अवगत व्हावे, यासाठी त्यांनी केलेली तळमळ ही कौतुकास्पद आहे. शशिकांत कुलथे यांना मिळालेला राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार हा जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवणारा आहे. या पुरस्कारामुळे इतर शिक्षकांनाही प्रोत्साहन मिळणार असल्याचे माजी मंत्री बदामराव पंडीत यांनी याप्रसंगी बोलताना सांगितले. तसेच विद्यार्थ्यांनीही शिक्षकांच्या मार्गदर्शनाचा उपयोग करून घ्यावा, असे आवाहन बदामराव पंडित यांनी केले. यावेळी कुलथे यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. यावेळी शशिकांत कुलथे यांचे आई-वडील, भाऊ व कुटुंबीय यांच्यासह पंडीत यांचे कार्यकर्ते उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...