आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्य कविसंमेलन:राष्ट्रपती पुरस्कार मिळाल्याने शशिकांत कुलथेंचा सत्कार

बीडएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

राष्ट्रपती पुरस्कार जाहीर झालेले गेवराई तालुक्यातील शिक्षक शशिकांत कुलथे यांचा मैत्रा फाउंडेशन या बहुउद्देशीय संस्थेमार्फत सत्कार करण्यात आला. श्री शशिकांत कुलथे यांच्या रूपाने बीड जिल्ह्याच्या सन्मानामध्ये मानाचा तुरा रोवला गेलेला आहे. शशिकांत कुलथे यांनी विद्यार्थी गुणवत्ता वाढीसाठी अनेक अभिनव प्रयोग केलेले आहेत. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांना या वर्षीचा राष्ट्रपती पुरस्कार जाहीर झालेला आहे.शिक्षकदिनी दिल्ली येथे होणाऱ्या कार्यक्रमात देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन मैत्रा फाउंडेशन बीडच्या वतीने बीड येथे राज्यस्तरीय काव्यसंमेलनामध्ये त्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लातूर येथील हिंदी कवी विशाल अंधारे होते, तर व्यासपीठावर बीड जिल्हा परिषदेचे प्राथमिक विभागाचे शिक्षण अधिकारी श्रीकांत कुलकर्णी, लक्ष्मी अर्बन निधी लिमिटेडचे परमेश्वर राठोड,मैत्रा फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष द.ल. वारे, जिल्हाध्यक्ष संजय राठोड, उपाध्यक्ष अश्विनी शिंदे, संगीता आदमाने, राज्य सचिव हर्षा ढाकणे, माधुरी कोटुळे, शीतल गायकवाड, उज्ज्वला वनवे, नितीन फसले, उद्धव बडे व महाराष्ट्रातून आलेले कवी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सत्काराबद्दल कुलथे यांनी आभार व्यक्त केले.

बातम्या आणखी आहेत...