आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मृत्यू:शेख सादेक हमीद व त्यांचा मुलगा शेख रफिक सादेक ;नाथ प्रतिष्ठानकडून दोन मुलींच्या नावे 50 हजार रुपयांची मुदत ठेव

परळी23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील वडगाव (दादाहरी) गावातील शेख सादेक हमीद व त्यांचा मुलगा शेख रफिक सादेक या दोघांचा विहिरीत बुडून मृत्यू झाला होता.मृत शेख रफिक यांच्या कुटुंबीयांना मदत म्हणून धनंजय मुंडे यांनी रफिक यांच्या दोन मुलींच्या नावाने नाथ प्रतिष्ठानकडून प्रत्येकी ५० हजार रुपयांची मुदत ठेव बँकेत केली असून, त्याचे मुदत ठेव पत्र शेख कुटुंबीयांना वाल्मीक कराड यांच्या हस्ते देण्यात आले.

सादेक शेख विहीरीतून पाणी काढताना पडले असता, त्यांचा मुलगा वाचवायला गेला मात्र तोही बुडाला, त्यानंतर दुसरा मुलगा त्या दोघांना वाचवायला गेला असता तो पण विहिरीत पडला, मात्र दुसऱ्या मुलाला वाचवण्यात आईला यश आले. धनंजय मुंडे यांनी राष्ट्रवादी आपल्या दारी या अभियानांतर्गत बरकत नगर येथे शेख कुटुंबीयांच्या घरी जाऊन भेट दिली होती.मयत रफिक यांच्या आयरा (३ वर्षे) व अनाम (२ महिने) या अत्यंत लहान दोन मुली असून त्यांच्या भविष्यातील शिक्षण व अन्य कामांसाठी ५० हजारांची मुदत ठेवीच्या स्वरूपातील ही रक्कम मोठी होऊन त्यांना मिळणार आहे. यावेळी अय्युब पठाण,जाफर खान,नितीन कुलकर्णी,अजीज कच्छी,रवी मुळे,दत्ता सावंत,अल्ताफ पठाण यांसह आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...