आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कौतुकांचा वर्षाव:मेंढपाळाची मुलगी महाराष्ट्रात प्रथम ही अभिमानास्पद बाब : प्रा. ईश्वर मुंडे

धारूर2 महिन्यांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक

सर्व सामान्य मेंढपाळाची मुलगी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परिक्षेत सर्वाधिक गुण घेवून महाराष्ट्रातून सर्व प्रथम येते ही अभिमानास्पद बाब असून या प्रेरणेतून भविष्यात अनेक गुणवंत विद्यार्थी यशस्वी होतील, असे प्रतिपादन ईश्वर शिक्षण संस्थेचे सचिव तथा राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश सरचिटणीस प्रा. ईश्वर मुंडे यांनी केले. तालुक्यातील अंजनडोह येथील मेंढपाळ शेतकरी बालासाहेब धापसे यांची मुलगी अंजली ही अभियांत्रिकी पदवीधारक असून सन २०१९ मध्ये झालेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परिक्षेत एनटी महिला प्रवर्गातून सर्वाधिक गुण घेऊन महाराष्ट्रातून सर्व प्रथम आली.

तिच्या या यशाबद्दल अंजनडोह जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेत सत्कार करण्यात आला. यावेळी प्रा.मुंडे हे बोलत होते. सत्कारास उत्तर देताना अश्विनी धापसे म्हणाल्या, गुणवत्ता व सतत मेहनत करीत राहिल्यावर यश नक्कीच मिळते. विद्यार्थ्यांनी आपले ध्येय लवकर ठरवले तर यश लवकर मिळते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा जयश्री पंढरीनाथ सोळंके या होत्या. यावेळी सुदर्शन सोळंके, सरपंच नितीन कांबळे, काँग्रेसचे नेते सुबराव सोळंके, बाळासाहेब पंचभाई, बाबासाहेब काळे, मेजर महेश्वर सोळंके, सुधीर सोळंके, सुनिल सोळंके, दयानंद सोळंके, विवेकानंद सोळंके, परमेश्वर सोळंके, रवींद्र सोळंके आदींची उपस्थिती होती. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जिल्हा परिषद केंद्रीय शाळेच्या शिक्षिका एम. बी. कुलकर्णी, एस.बी.कांबळे, एल. व्ही. वेदे, व्ही. एम. माने, एस. टी. निर्मळ यांनी प्रयत्न केले.

बातम्या आणखी आहेत...