आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबीड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या संरक्षक भिंतीसह सुशोभीकरण औरंगाबाद पॅटर्न प्रमाणे दर्जेदार करावे या मागणीसाठी तालुक्यातील लिंबागणेश येथुन बीडपर्यंत ३० किलोमीटर अंतराची शुक्रवारी टाळमृदंगाच्या गजरात पायी दिंडी काढण्यात आली. बीड तालुक्यातील लिंबागणेश येथुन शुक्रवारी सकाळी सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश ढवळे यांच्या नेतृत्वाखालील पायी दिंडी बीडकडे मार्गस्थ झाली. मांजरसुंबा, कोळवाडी, पाली, बार्शीनाका मार्गे ही दिंडी बीड शहरात दाखल झाली.
या पायी दिंडीत अनंतकाका मुळे, गणपत घोलप,बाजीराव दशमे, राजेभाऊ गिरे, रामदास फाळके, पांडुरंग वाणी, विक्की वाणी, हरीओम क्षीरसागर, दामु थोरात, मोहन कोटुळे, पिंपरनई सरपंच बाळासाहेब वायभट, विलास काटे, गणेश घाडगे, कृष्णा वायभट आदी शिवप्रेमी सहभागी झाले होते. बीड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याजवळ ही दिंडी दुपारी पोहचली.
यावेळी नगर पालिकेचे कार्यालयीन अधीक्षक कदम व उपअभियंता जाधव यांना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा सुशोभिकरण तातडीने करण्यात यावे, छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरातील बॅनरमुळे शहराचे विद्रुपीकरण होवुन अपघाताचे प्रमाण वाढत आहे. पालिकेचा जाहीरात कर बुडवणाऱ्या विनापरवाना बॅनरवर दंडात्मक करावी या मागणीचे निवेदन देण्यात आले. यावेळी रामनाथ खोड, शेख युनुस, मिलिंद सरपते, बलभीम उबाळे, अॅड .राज पाटील, आनिल माने आदी उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.