आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यशोवार्ता:वडिलांच्या पश्चात मुलाने केली स्वप्नपूर्ती, धारूर येथील शिवप्रसाद तिडके एमबीबीएस प्रवेशासाठी पात्र ठरला

धारूर3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

धारूर येथील सरस्वती विद्यालयाचा विद्यार्थी शिवप्रसाद श्यामसुंदर तिडके याची डॉ.एन.वाय तासगावकर इन्स्टीट्यूट ऑफ मेडीकल सायन्स कर्जत येथे एमबीबीएस वैद्यकीय शिक्षणासाठी निवड झाली आहे. वडिलांच्या निधनानंतर त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यात शिवप्रसादला यश आले. या यशाबद्दल त्याच कौतुक होत आहे.

येथील सरस्वती विद्यालय धारूरचा माजी विद्यार्थी शिवप्रसाद तिडके एमबीबीएस प्रवेशासाठी पात्र ठरला असून सरस्वती विद्यालयातील शिक्षिका मुंडे यांचा तो मुलगा आहे. रायगड जिल्ह्यातील कर्जत येथील डॉ.एन.वाय.तासगावकर इन्स्टीट्युटमध्ये एमबीबीएस शिक्षणासाठी तो पात्र ठरला आहे. त्याचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण सरस्वती विद्यालय धारूर येथे झाले आहे. त्याला डॉक्टर बनवण्याचे स्वप्न वडील श्यामसुंदर तिडके यांनी पाहिले होते. परंतु, काही दिवसांपूर्वीच त्यांचे दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनापश्चात अवघ्या पंधरा दिवसात शिवप्रसाद तिडके याने वडीलाचे स्वप्न पुर्ण केले असून त्याचा एमबीबीएस शिक्षणास प्रवेश निश्चीत झाला आहे. त्यांचा प्रवेश निश्चीत होताच नातेवाईकांच्या डोळ्यात आनंदाश्रू दिसून आले. त्याची एमबीबीएस शिक्षणासाठी निवड झाल्याचे समजतात सरस्वती प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक काशिनाथ दळवे, माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक जगदीश तोष्नीवाल तसेच सरस्वती विद्यालयाच्या सर्व कर्मचारी वृंद यांनी शिवप्रसाद तिडकेचे अभिनंदन करून कौतुक केले आहे. वडीलाचे स्वप्न साकार करण्यासाठी त्याला सर्वांनी प्रोत्साहन दिले आहे.

बातम्या आणखी आहेत...