आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशिवसंग्रामच्या माध्यमातून विविध घटकांच्या हितासाठी सातत्याने उपक्रम राबवले जातात. महिला आघाडीही बीड शहर व जिल्ह्यात सक्रिय असून महिला सक्षमीकरणासाठी व्यापक कार्य सुरू आहे, याचा आनंद वाटतो. महिलांना सक्षम करण्यासाठी नवनवीन कौशल्यांचे प्रशिक्षण देणे गरजेचे आहे. त्या दृष्टीने शिवसंग्राम महिला आघाडीचे व्यासपीठ खुले असून यापुढेही हे काम विस्तारावे, असे आवाहन शिवसंग्रामचे अध्यक्ष माजी आमदार विनायक मेटे यांनी केले.
बीड येथे शिवसंग्रामचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी आमदार विनायकराव मेटे यांच्या सूचनेवरून व शिवसंग्राम महिला आघाडीच्या वतीने पक्ष - संघटना विस्तारीकरण व महिलाचे सक्षमीकरण या संदर्भात कार्यक्रमाचे आयोजन केले होते. याप्रसंगी मेटे बोलत होते. या कार्यक्रमाप्रसंगी राजमाता जिजाऊ माँसाहेब यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. या कार्यक्रमात केक बनवण्याचे प्रशिक्षण महिलांना देण्यात आले.
प्रमुख पाहुण्या म्हणून सुनिता वीर, कल्याणी कटके या उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ॲड. मनीषा कुपकर होत्या तर संध्या लांगोरे, साधना दातखिळ, रेखा तांबे व संगीता ठोसर यांची प्रमुख उपस्थित होती. आमदार मेटे यांनी यापुढेही महिलांसाठी सक्षमपणे कार्य करण्याचे आवाहन सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांना केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षा ॲड. मनीषा कुपकर म्हणाल्या, माँसाहेब जिजाऊ, सावित्रीबाई फुले, अहिल्यादेवी होळकर यांचा वारसा आपल्याला लाभला आहे. त्यामुळे महिलांनी नवनवीन कौशल्य आत्मसात करत स्वत:ला अद्ययावत करावे. शिवसंग्रामच्या महिला आघाडीच्या वतिने यापुढेही विविध उपक्रम राबवणार आहोत. माजी आमदार विनायकराव मेटे यांची विविध समाज घटकांसाठी व्यापक कार्य केले.
आता त्यांच्या माध्यमातून महिला भगिनींच्या पेन्शनसाठी शिवसंग्रामची महिला आघाडी काम करेल. तसेच महिला विषयक धोरणासाठी शिवसंग्राम हे एक मोठे व्यासपीठ मेटे यांनी उपलब्ध करून दिले, असेही त्यांनी सांगितले. यावेळी शिवसंग्रामचे जिल्हाध्यक्ष नारायण काशीद, जिल्हा सरचिटणीस अनिल घुमरे, सुहास पाटील, युवक जिल्हाध्यक्ष रामहरी मेटे, शहर उपाध्यक्ष शेषराव तांबे, ऊसतोड कामगार नेते बबनराव माने, युवा नेते मुकुंद गोरे, विद्यार्थी आघाडीचे जिल्हाध्यक्ष अक्षय माने, युवक शहराध्यक्ष प्रशांत डोरले हजर होते.
महिलांनी एकत्रितपणे कार्य केले तर विकासाला गती
प्रगती साधण्यासाठी जेव्हा आपण एकत्र येत प्रयत्न करतो. तेव्हा यश फारसे दूर राहत नाही. त्यामुळे आजच्या काळानुरूप महिलांनी नवनवीन कौशल्ये आत्मसात करावेत. शिवाय एकत्र येत व्यवसाय, उद्योगाच्या दिशेने पाऊल टाकावे. समाजकारण व राजकारणात आल्याशिवाय बीड शहराचा विकासासंदर्भातील चेहरा बदलणार नाही. त्यासाठी आपण खांद्याला खांदा लावून काम करू, असे संध्या लांगोरे यांनी याप्रसंगी सांगितले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.