आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मार्गदर्शन:शिवसंग्रामने कष्टकरी, वंचितांचे प्रश्न तडीस लावण्याचे कार्य केले; आमदार विनायक मेटे यांचे प्रतिपादन

बीड4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • ग्रा.पं. सदस्यांचा शिवसंग्राममध्ये प्रवेश

ऊसतोड कामगार असो किंवा कष्टकरी, वंचित समाजातील घटक, शिवसंग्रामने यावेळी प्रत्येक समाज घटकांचे प्रश्न मांडले व ते तडीस लावण्याचे काम केले, असे प्रतिपादन आमदार विनायकराव मेटे यांनी केले.

बीड येथे शिवसंग्रामचे संस्थापक अध्यक्ष आमदार विनायकराव मेटे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये बेलगावचे ग्रामपंचायत सदस्य शंकर जाधव, युवा नेते विठ्ठल शेळके, नितीन शेळके, रोहिदास शेळके, विकास शेळके यांनी ऊसतोड कामगार नेते बबनरावजी माने यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसंग्राममध्ये जाहीर प्रवेश केला. याप्रसंगी मेटे हे बोलत होते. शिवसंग्रामचे तालुकाध्यक्ष नवनाथ प्रभाळे, शिवसंग्रामचे नेते नारायण काशीद, ओबीसी नेते बंडू शहाणे, सचिन आमटे, हिरामन शिंदे, धर्मराज मसवले, किसन महाराज शेळके, नवनाथ महाराज शेळके यांची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी आमदार मेटे यांनी बीड पंचायत समितीचे लिंबागणेश सर्कलचे पंचायत समिती सदस्य तथा शिवसंग्रामचे ऊसतोड कामगार नेते बबनराव माने यांचा वाढता जनसंपर्क व प्रत्येक गावातील घराघरांमध्ये ऊसतोड कामगार या नात्याने ओळख निर्माण करणारे संकटकाळी मदतीला धावून जाणारे तसेच मुलीबाळीच्या लग्नामध्ये पुढाकार घेणारे असे नेतृत्व आहे. शिवसंग्रामच्या माध्यमातून ते समाजकारणात व राजकारणात सक्रिय आहेत. अशाच पध्दतीने प्रत्येक कार्यकर्त्याने समाजातील वंचित, उपेक्षितांचे प्रश्न यापुढेही सोडवण्याचे काम केले पाहिजे, असेही आमदार विनायक मेटे यांनी सांगितले. पंचायत समिती व जिल्हा परिषदेचे आता नुकतेच बिगुल वाजणार आहे. यासाठी शिवसंग्रामने ही चांगली कंबर कसली आहे. संपूर्ण जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका तसेच बीड नगरपालिकेची निवडणूक पूर्ण ताकदीनिशी लढवायची, असे आदेश विनायकराव मेटे यांनी याप्रसंगी सर्व कार्यकर्त्यांना दिले. दरम्यान, याप्रसंगी इतर मान्यवरांनीही मार्गदर्शन केले. बबनराव माने यांनी येणाऱ्या काळामध्ये शिवसंग्रामचे पारडे हे जड होणार असल्याचे सांगत राजकीय संकेत दिले. यावेळी शिवसंग्रामचे तालुकाध्यक्ष नवनाथ प्रभाळे, शिवसंग्रामचे नेते नारायण काशीद, ओबीसी नेते बंडू शहाणे यांनीही मार्गदर्शन केले.

बालाघाटावर पुन्हा शिवसंग्राम बळकट होणार
आमदार विनायक मेटे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवणारा मोठा वर्ग बालाघाटावर आहे. यापुढील काळात या सर्व कार्यकर्त्यांची मोट बांधत पुन्हा एकदा शिवसंग्रामला गतवैभव मिळवून देणार असल्याचे शिवसंग्रामचे नेते बबनराव माने यांनी सांगितले. याप्रसंगी नवनाथ प्रभाळे यांनीही कार्यकर्त्यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांसाठी जोमाने कामाला लागण्याबाबत सूचना केल्या.

बातम्या आणखी आहेत...