आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सभा:मुख्यमंत्र्यांच्या सभेच्या तयारीसाठी आज गेवराईत शिवसेनेचा मेळावा; चंद्रकांत खैरे करणार मार्गदर्शन

गेवराईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या ८ जून रोजी औरंगाबाद येथे होणाऱ्या सभेच्या नियोजनासाठी गुरुवारी (ता.२ जून) गेवराईत शिवसैनिकांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. शिवसेना मराठवाडा संपर्क नेते, माजी खासदार चंद्रकांत खैरे, माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर, माजी राज्यमंत्री बदामराव पंडित आणि शिवसेना जिल्हाप्रमुख अनिल जगताप हे मेळाव्यात मार्गदर्शन करणार आहेत.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची ८ जून रोजी औरंगाबाद येथे सभा होणार आहे. ही सभा विराट व्हावी यासाठी बीड जिल्ह्यात शिवसेनेकडून मोर्चेबांधणी करण्यात येत आहे. गेवराई येथे माजी राज्यमंत्री बदामराव पंडित यांच्या निवासस्थानी २ जून रोजी तालुक्यातील शिवसैनिकांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी १० वाजता होणाऱ्या या मेळाव्यास उपस्थित राहावे, असे आवाहन शिवसेना जिल्हा समन्वयक तथा जि.प.चे माजी सभापती युधाजित पंडित यांनी केले.

बातम्या आणखी आहेत...