आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातालुक्यात शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन तोडून सक्तीची विजबील वसुली चालू आहे तसेच २०२० चा विमा अद्याप ही शेतकऱ्यास दिलेला नाही या विरोधात शिवसेना पक्षाच्या वतीने चक्का जाम आंदोलन केले.
अगोदरच शेतकरी आसमानी अतीवृष्टी मुळे अत्यंत संकटात सापडला आहे. त्याचे संपुर्ण पिके जमिनधोस्त झालेले आहेत त्यामुळे त्या संकटाला तोंड देता देता त्याची मानसिकता आत्महत्याच्या दिशेने वाटचाल करत आहे.
त्यातच पिक विमा कंपनीने २०२० चा विमा अद्याप ही शेतकन्यास दिलेला नाही. सर्व बाजुनी आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यास लवकरात पिक विमा मिळवून द्यावा व सक्तीची विज बील वसुली तात्पुरती थांबवावी तसेच २०२२ चा पिक विमा सरसगट मंजुर करावाया मागण्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या आदेशानुसार शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, संपर्क प्रमुख धोंडु पाटीलसह संपर्क प्रमुख बाळासाहेब अंबुरे,केज मतदार संघ संपर्कप्रमुख परशुराम जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाप्रमुख अप्पासाहेब जाधव यांच्या नेतृत्त्वात करण्यात आली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.