आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चक्का जाम:शेतकऱ्यांच्या वीज प्रश्नावर शिवसेनेचा चक्का जाम

बीड2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शेतकऱ्यांच्या वीज तोडणी विरोधात शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाच्या वतीने गुुरुवारी बीडमध्ये चक्का जाम आंदोलन करण्यात आले. यावेळी शिवसैनिकांनी महामार्गावर ठिय्या मांडून आंदोलन करत घोषणबााजी केली.

या आंदोलनात िवसेना जिल्हा समन्वयक बाबासाहेब घुगे, शिवसेना जिल्हा संघटक नितीन धांडे, किसान सेना जिल्हा संघटक परमेश्वर सातपुते, उपजिल्हाप्रमुख हनुमान जगताप, तालुकाप्रमुख गोरख सिंघण, शिवसेना शहर प्रमुख बीड सुनिल सुरवसे यांचा सहभाग होता. यावेळी बाेलताना जिल्हाप्रमुख जगताप म्हणाले, हे सरकार केवळ घोषणाबाजी करत आहे. वीज वितरण कंपनी आणि पीक विमा कंपन्यांची नौटंकी न थांबल्यास शिवसेना आपल्या स्टाईलमध्ये आंदोलन करेल आणि अधिकाऱ्यांना रस्त्यावर फिरू देणार नाही, असा इशारा अनिल जगताप यांनी दिला.

धारूर : शिवसेनेच्या वतीने रास्ता रोको
धारूर | शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर छत्रपती शिवाजी महाराज चौकात रस्ता रोको आंदोलन करण्यात आले . शेतकरी पिक विमा महावितरण कडून होणारी लाईट बिल वसुली आदी प्रश्नांवर रस्ता रोको आंदोलन करण्यात आले . शिवसेना जिल्हाप्रमुख अप्पासाहेब जाधव यांच्या नेतृत्वाखालील हे आंदोलन करण्यात आले . यावेळी शिवसेना तालुका प्रमुख नागेश शिनगारे, शिवसेना युवा नेते शरद उबाळे, शिवसेना शहरप्रमुख बाबा सराफ , तालुका संघटक बंडू सावंत, शिवसेना माजी तालुका प्रमुख विनायक ढगे, ‌धनंजय शिनगारे, सचिन सत्वधर आदी उपस्थित होते .

बातम्या आणखी आहेत...